आषाढी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेच्या चरणी १० कोटी ८४ लाख रुपयांची देणगी मिळाली आहे. सोने, चांदीचे दागिन्यांसह मंदिर समितीला लाडू प्रसाद, देणगी, भक्तनिवास फी, हुंडीपेटी, श्रींच्या चरणाजवळ दान आदी विविध देणग्यांच्या माध्यमातून हे उत्पन्न मिळाले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत सुमारे २ कोटी ३५ लाख रुपयांचे उत्पन्न अधिक असल्याचे सांगण्यात आले. यंदा आषाढी यात्रा कालावधीत दर्शनरांगेत भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. भाविकांचे सुलभ व जलद दर्शन होण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना देखील मंदिर समितीने केल्याचे मंदिरे समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले. २६ जून ते १० जुलै या कालावधीत भाविकांनी ७५ लाख रुपये दान केले आहेत. भाविकांना देणगीतून अधिक सुविधा पुरवू श्रींच्या चरणाजवळील रकमेत यंदा दोन लाखांची घट असली तरी देणगीत मात्र सुमारे १९ लाखांची अधिक वाढ आहे. या दानातून वारकरी भाविकांना सोयी-सुविधा देण्याचा प्रयत्न राहील. - मनोज श्रोत्री, व्यवस्थापक, मंदिर समिती, पंढरपूर. आषाढी यात्रेची सांगता : २० दिवसांपासून बंद देवाचे नित्योपचार सुरू आज बुधवारी (१६ जुलै) रोजी श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेची प्रक्षाळपूजा झाली. त्याचबरोबर गेले २० दिवस बंद असलेले देवाचे नित्योपचार सुरू करण्यात आले आहेत. यात्रेला भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता, श्रींचा पलंग काढून भाविकांना २४ तास दर्शन उपलब्ध करून देण्यात येते. त्यानुसार २७ जून रोजी श्रींचा पलंग परंपरेनुसार काढण्यात आला होता.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/dlZGO8P
आषाढी यात्रा:विठ्ठल मंदिरास 11 कोटींचे उत्पन्न, 2.35 कोटी वाढ, भाविकांच्या सोयी-सुविधांसाठी रक्कम वापरणार, मंदिर समितीचा दावा
July 16, 2025
0