Type Here to Get Search Results !

भांडारकर संस्थेच्या नियामक मंडळाची निवडणूक बिनविरोध:अध्यक्षपदी अभय फिरोदिया, उपाध्यक्षपदी डॉ. प्रमोद जोगळेकर

भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराच्या नियामक मंडळाची 2025 ते 2030 या पंचवार्षिक कालावधीची निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली असून यामध्ये अध्यक्षपदी ज्येष्ठ उद्योजक अभय फिरोदिया, उपाध्यक्षपदी ज्येष्ठ पुरातत्वज्ञ डॉ. प्रमोद जोगळेकर आणि अन्य पदाधिकार्‍यांच्या निवडीची घोषणा संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष भूपाल पटवर्धन यांनी केली. याबरोबरच संस्थेचे विश्‍वस्त म्हणून माजी खासदार प्रदीप रावत व भारत फाटक यांची तर सर्वसाधारण़ सभेच्या अध्यक्षपदी अ‍ॅड. सदानंद फडके व उपाध्यक्षपदी डॉ. सदानंद मोरे यांची निवड करण्यात आली आहे. भांडारकर संस्थेच्या नियामक मंडळात एकूण 25 सदस्यांची बिनविरोध निवड झाली असून यामधील 7 सदस्यांची कार्यकारी मंडळामध्ये निवड करण्यात आली. कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षपदी भूपाल पटवर्धन, मानद सचिवपदी प्रा. सुधीर वैशंपायन, खजिनदारपदी संजय पवार तर सदस्यपदी डॉ. सदानंद मोरे, श्रीनिवास कुलकर्णी, प्रा. प्रदीप आपटे व डॉ. मैत्रेयी देशपांडे निवड झाली आहे. तर नियामक मंडळाच्या सदस्यपदी सुश्रुत वैद्य, मंदार जोग, मनोज एरंडे, प्रा. रवींद्र मुळ्ये, संतोष रासकर, साकेत कोटीभास्कर, देवयानी कुलकर्णी, सुनिल भंडगे, आशुतोष जोशी, अनिरुध्द देशपांडे, राजेंद्र जोग, अपूर्व सोनटक्के, अरुण नहार, डॉ. शिल्पा सुमंत, सुनिल त्रिंबके व अमित परांजपे यांची निवड करण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रसाद जोशी व जितेंद्र आफळे यांनी काम पाहिले. यावेळी संस्थेच्या वार्षिक अंकाचे (अ‍ॅनल्स ऑफ भांडारकर इन्स्टिट्यूट) आणि गेल्या 105 वर्षातील (1919 ते 2024) वार्षिक अंकांत प्रसिध्द झालेल्या लेखांच्या शिर्षकांचे (इंडेक्स) पुस्तक प्रकाशित करण्यात आले. त्याचबरोबर भागवतपुराणाची संदर्भसूची या डॉ. श्रीकांत बहुलकर संपादीत संशोधित ग्रंथाचे देखील प्रकाशन यावेळी करण्यात आले. या ग्रंथामध्ये भागवत पुराणावरच्या संस्कृत टीका, आधुनिक अनुवाद, प्राकृत टीका या सार्‍यांचा विद्वानांनी केलेला अभ्यास, नाटकं, काव्यं, गद्यरचना इ. लेखनाचा या संदर्भसूचीत समावेश आहे. संस्थेच्या भारतविद्या या ऑनलाइन कोर्सेसची माहिती देणाऱ्या वेबपोर्टलची माहिती यावेळी गौरी मोघे यांनी यावेळी उपस्थितांना दिली.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/vBPtqgT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.