Type Here to Get Search Results !

शालार्थ आयडी घोटाळ्यात नवी कारवाई:दोन कनिष्ठ लिपिकांसह 18 जणांना अटक; 41.49 लाखांचा गैरव्यवहार

राज्यभरात गाजत असलेल्या नागपूर जिल्ह्यातील शालार्थ आयडी घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार नीलेश वाघमारे याला अखेर चार महिन्यांनंतर अटक करण्यात आली. वाघमारेच्या अटकेनंतर या घोटाळ्यात अटकसत्र सुरू झाले आहे. पोलिसांनी रविवारी नागपुरातील दोन शाळांतील कनिष्ठ लिपिकांना अटक केली आहे. या गुन्ह्यात रविवार १७ रोजी स्व. श्रावणजी वाटकर उच्च प्राथमिक शाळा, हुडकेश्वर येथील कनिष्ठ लिपिक मंगेश केशव निनावे (वय ३५) तसेच केशवनगर उच्च प्राथमिक शाळा, नंदनवन येथील कनिष्ठ लिपिक मनिषकुमार केशव निनावे (वय ३२) यांना अटक करण्यात आली. या दोघांचीही नियुक्ती बनावट शालार्थ आय. डी.द्वारे झाली होती. हे माहिती असूनही मंगेश केशव निनावे याने मार्च २०२३ पासून तर मनिषकुमार केशव निनावे याने जुलै २०१९ पासून नियमित वेतन घेवून शासनाची अंदाजे ४१ लाख ४९ हजार रुपयांपेक्षा पेक्षा जास्त आर्थिक फसवणूक केली आहे. शालार्थ आयडी प्रकरणात आतापर्यंत ०३ विभागीय शिक्षण उपसंचालक, ०३ शिक्षणाधिकारी, ०४ लिपिक, ०२ शाळा मुख्याध्यापक, ०२ शाळा संचालक, ०३ सहाय्यक शिक्षक तसेच ०१ वेतन अधीक्षक असे एकूण १८ आरोपी अटक करण्यात आलेले आहेत. विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील कनिष्ठ प्रशासन अधिकारी रवींद्र ज्ञानेश्वर पाटील यांनी या संबंधी तक्रार केल्यानंतर घोटाळा उजेडात आला होता.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/qEwT9L6

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.