Type Here to Get Search Results !

मुंढव्यात वाहतूक पोलिस उपायुक्तांच्या गाडीला धडक:दोन पोलिस कर्मचारी जखमी, मद्यधुंद कार चालकासह एका व्यक्तीला अटक

मुंढवा परिसरात गणपती उत्सवानिमित्त खरेदी निमित्त होत असलेली वाहनांची गर्दी नियंत्रित करण्याच्या दृष्टीने वाहतुक पोलिस आयुक्त व त्यांच्यासोबत दोन पोलिस कर्मचारी चालले असताना समोरून भरधाव वेगात असलेल्या मद्यधुंद कार चालकाने जोरदार धडक दिली. धडकेत दोन पोलिस कर्मचारी जखमी झाले. यामध्ये वाहतुक पोलिस उपायुक्त हिमंत जाधव यांना सुदैवाने इजा झाली नाही. याप्रकरणी धडक देणार्‍या चालकासह दोघांना मुंढवा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. याप्रकरणी समदिप मनमोहन सिंग (३०, रा. शुभ इवान, मिडोरी वाईन्स जवळ, केशवनगर, मुंढवा मुळ रा. हरीयाना) याला याप्रकरणी ताब्यात घेण्यात आले. याबाबत पोलिस नाईक शरद अर्जुन पवार (३८, रा. हिंद कॉलनी, भेकराईनगर, पुणे) यांनी मुंढवा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रादार शरद पवार ह पोलिस मुख्यालयात २०२२ पासून नेमणुकीस आहे. सध्या ते वाहतुक पोलिस उपायुक्त हिंमत जाधव यांच्याकडे शासकीय वाहनावर ऑपरेटर म्हणुन कार्यरत आहे. दि. १५ ऑगस्ट रोजी पवार हे कामावर आले असताना सोबत चालक पोलिस हवालदार तानाजी कोंढाळकर हे देखील होते. कोंढाळकर हे गाडी चालवत असताना पवार त्यांच्या शेजारील सीटवर बसले होते. तर पोलिस उपायुक्त हिंमत जाधव गाडीच्या मागील सिटवर बसलेले होते. मुंढवा येथील कुंभारवाडा येथे गणेशमूर्ती विकत घेण्याकरता नागरिकांची व वाहनांची गर्दी होत असल्याने केशवनगर कुंभारवाडा या भागाची पाहणी करण्यासाठी आले होते. पाहणी करून झाल्यावर सव्वा दहा ते साडे दहा वाजण्याच्या सुमारास कुंभारवाडा येथून मुंढवा चौकाकडे परत जात असताना रोडला नागरिकांची गर्दी होती. त्यामुळे कोंढाळकर हे कार हळू चालवत होते. पोलिस उपायुक्त बसलेली गाडी मुंढव्यातील केशवलीला अपार्टमेंट येथे आली असताना मुंढवा चौकाकडून केशवनगरकडे जाणार्‍या भरधाव कारने पोलिस उपायुक्तांच्या गाडीला धडक दिली. या अपघातात पोलिस नाईक पवार यांच्या ओठाला व दाताला दुखापत झाली. तर चालक कोंढाळकर यांचे डाके दरवाज्यावर आपटल्याने त्यांच्या डोक्याला मुकामार लागला. या अपघातनंतर पोलिस उपायुक्त व पवार यांनी गाडीतून उतरून पाहिले असता उजव्या बाजूने गाडीची पूर्ण बॉडी डॅमेज होऊन चाक मागील बाजूस सरकले होते. धडक देणार्‍या गाडीची पाहणी केली असता, ती कार संदीप सिंग चालवत असल्याचे समजले. त्याच्यासोबत मनीषकुमार सुमानकुमार सिंग (२८, रा. शुभ शगुन सोसायटी, जुना मुंढवा रोड, खराडी) असल्याचे समजले. पोलिस उपायुक्तांनी लागलीच स्थानिक मुंढवा पोलिसांना बोलवून मद्यधुंद अवस्थेत असलेल्या दोघांना पोलिसांच्या हवाली केले. याप्रकरणी पुढील तपास मुंढवा पोलिस करत आहेत.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/5y2IjUL

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.