वंचित उपेक्षित समाजावर, वर्गावर पोलिसांचा अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढत आहे .खूप मोठ्या प्रमाणावर दबाव असूनही शहीद सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबीय,त्यांची आई कोणत्याही दबावाला बळी पडली नाही त्यामुळे न्याय देता आला असे मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले . कस्टडीत मरण पावलेल्या लोकांना न्याय मिळत नाही महाराष्ट्रात अशा फार घटना घडल्या आहेत परंतु त्यांना न्याय मिळत नाही.ज्या हिमतीने सोमनाथचे कुटुंब दबावाला बळी पडले नाही त्यामुळे कायद्यातील त्रुटी भरून काढता आली व न्याय देता आला .असे मत वंचित बहुजन आघाडीचे नेते अँड.प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले . पुढे ते म्हणाले की ,सूर्यवंशीच्या निमित्ताने जे आतापर्यंत १८०० कस्टडीत मरण पावले त्यांना न्याय मिळण्याचे सोपे झाले आहे .आता देशभरात कस्टडीत मरण पावणाऱ्या लोकांची संख्या कमी होईल .असेही ते म्हणाले . महाराष्ट्र राज्य वडार समाजाच्या वतीने आज पुण्यात वंचित आघाडीचे नेते अँड.प्रकाश आंबेडकर यांचा भव्य नागरी सत्कार आयोजीत करण्यात आला होता त्यावेळी आंबेडकर बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष व आयोजक वडार समाजाचे नेते अनिल जाधव आपल्या मनोगतात म्हणाले की ,वडार समजावर वर्षानुवर्षे अन्याय होत आहे त्यांना न्याय देणारे कोणी नव्हते ,आज इतक्या वर्षात वडार समाजाला न्याय मिळाला नाही पण आज अँड.प्रकाश आंबेडकर यांनी शहीद सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळवून दिला .वडार समाज हा अतिशय वंचित असून शासनाच्या व इतर समाजाच्या विकासापासून अतिशय दूर आहे .परंतु आता या समाजाला प्रकाश आंबेडकर यांच्या रूपाने अतिशय महत्त्वाचे नेतृत्व मिळाले आहे .वडार समाजासाठी व शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्यासाठी आंबेडकर यांनी स्वत्त लक्ष घालून न्याय मिळवून दिला हे अतिशय महत्वाचे कार्य असून त्यासाठी वडार समाजाच्या वतीने आज त्यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला .यावेळी कार्यक्रमास आलेल्या मान्यवरांचे स्वागत आयोजक अनिल जाधव यांनी केले . पोलिसांनी माझ्या मुलाला मारले ,हे सरकार न्याय देत नव्हते पण प्रकाश आंबेडकर यांनी माझ्या मुलाला त्यांनी स्वत्त वकिलाचा कोट घालून न्याय मिळवून दिला अशा भावना व्यंकयाताई नायडू यांनी अश्रू ढाळीत व्यक्त केल्या .
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/q7bVzma
सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात कुटुंबाचा दबावाला विरोध:कस्टडी डेथमधील 1800 कुटुंबांना न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा - प्रकाश आंबेडकर
August 25, 2025
0