Type Here to Get Search Results !

मुलींवर हात टाकणाऱ्यांचे हातपाय तोडून त्यांना पोलिसात दिले पाहिजे:आपली सत्ता नसली तरी राज ठाकरे सत्तेत आहेत, अमित ठाकरेंचे पुण्यात भाषण

मुलींवर हात टाकणाऱ्यांचे हातपाय तोडून त्यांना पोलिसात दिले पाहिजे, पालकांनी मुलामुलींना शाळेत पाठवायला घाबरु नये, असे विधान महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी अध्यक्ष अमित ठाकरे यांनी केले आहे. पुण्यात एका कार्यकरमत बोलताना त्यांनी हे विधान केले आहे. तसेच आपली सत्ता नसली तरी राज ठाकरे सत्तेत आहेत, असेही यावेळी बोलताना अमित ठाकरे यांनी म्हटले आहे. पुण्यात कार्यक्रमात बोलताना अमित ठाकरे म्हणाले, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा अध्यक्ष झाल्यापासून एकच स्वप्न होते की आपण विद्यार्थी विद्यार्थिंनी पर्यंत पोहोचावे. तुम्ही माझे स्वप्न साकार करत आहात. मी तुमच्यामुळे आहे, माझ्यामुळे तुम्ही नाही आहात. मी पालकांशी बोलायला आलो आहे, जे माझे स्वप्न आहे, मुलगा आणि मुलगी शाळेत गेल्यावर ते सुरक्षित असावेत. महाविद्यालयात गेल्यावर ते सुरक्षित असावेत, त्यांच्या आयुष्यात अडचणी नसाव्यात. काही गोष्टी पालकांपर्यंत पोहोल्या नाही तर आम्ही आहोत. हे सांगायला आज आलो आहे. पालक म्हणून मुलाला काय झाले? मुलीला काय झाले? मुलाला काय झाले तर पुढे काय? उशिरा फोन आला तर पुढे काय अशी भीती पालकांना असते. माझा मुलगा शाळेत जाणारे त्यामुळे मला हे माहिती आहे, असेही अमित ठाकरे म्हणाले. महेशजी तुम्ही जसे बोललात, इकडे आता मुलींवर हात टाकण्याच्या घटना वाढल्या आहेत, त्यांचे हात पाय तोडून तुम्ही पोलिसांना दिले पाहिजे. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात राहतो. त्या मुलांचे हात पाय मोडून पोलिसांकडे दिले पाहिजेत. हे राज्य असे नाही की मुलींवर हात टाकू शकतो. एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही शाळेत जर पाठवत असाल, महाविद्यालायता पाठवत असाल तर आपली सत्ता नसेल तरी राजसाहेब सत्तेत आहेत. ही गोष्ट तुम्ही विसरु नका. आम्ही तुमच्या संपर्कात असू हे तुम्हाला वचन देतो, पालकाशी बोलायला आलोय मुलांना शाळेत पाठवायला, महाविद्यालयात पाठवायला घाबरु नका आम्ही आहोत, हे वचन द्यायला आलोय, असे अमित ठाकरे म्हणाले.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/4viQGgH

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.