कॉर्डेलिया क्रूझवरील ड्रग्ज प्रकरणामुळे चर्चेत आलेले एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे आणि अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान यांच्यातील वाद पुन्हा एकदा पेटला आहे. आर्यन खानने दिग्दर्शित केलेल्या “बॅड्स ऑफ बॉलिवूड’ या वेब सीरिजविरोधात वानखेडेंनी थेट दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या सिरीजमध्ये आपली बदनामी केल्याचा आरोप त्यांनी केला. काय आहे नेमके प्रकरण? आर्यन खान दिग्दर्शित ही ८ भागांची वेब सीरिज नुकतीच प्रदर्शित झाली आहे. या सिरीजमधील एका भूमिकेवरून हा वाद सुरू झाला आहे. सिरीजमध्ये “ड्रग्जविरोधात लढणारा’ एक अधिकारी दाखवला आहे, जो हुबेहूब समीर वानखेडेंसारखा दिसतो. हे पात्र एका बॉलीवूड पार्टीवर छापा टाकते आणि एका अभिनेत्याला अटक करते. हे दृश्य प्रदर्शित होताच सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा सुरू झाली. नेटकऱ्यांनी याचा थेट संबंध वानखेडे आणि आर्यन खानच्या २०११ मधील प्रकरणाशी जोडला.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/nzYNgka
आर्यन खानच्या सिरीजमध्ये माझी बदनामी- वानखेडे:हायकोर्टात याचिका, 2 कोटींची भरपाईची मागणी
September 25, 2025
0