राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला असून, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सुरू आहे. याचा सर्वाधिक फटका मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला बसला आहे. मराठवाड्यात पावसाच्या तडाख्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक हिरावले गेले आहे. या मुसळधार पावसामुळे नद्या-नाल्यांना पूर येऊन अनेक जनावरे दगावली आहेत. शेतातील पिके वाहून गेली असून, अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, उद्याही (दिनांक 18 सप्टेंबर) अनेक भागांमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आल्यामुळे पावसाचा धोका अद्यापही कायम आहे. महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने 18 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. या अंदाजानुसार, उद्या राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस पडेल आणि ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यावर दुहेरी संकट येण्याची शक्यता असून, नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वीजांच्या कडकडटासह तसेच मेघगगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या काळात वाऱ्याचा वेग 30-40 किमी इतका असण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोकणामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून, कोकणातील तीन जिल्हे सिंधुदुर्ग, रायगड आणि रत्नागिरीमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, तर मुंबई आणि पालघरमध्ये मध्यम ते जोरदार स्वरुपाचा पाऊस पडू शकतो असा अंदाज आहे. पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता दुसरीकडे, पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पुणे, सातारा आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज असून, सोलापूरमध्ये आधीच मोठं नुकसान झालं असलं, तरी पुन्हा एकदा जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर, पुणे, सातारा, कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यांना हवामान विभागाने 'यलो अलर्ट' जारी केला आहे. विदर्भात हाय अलर्ट दरम्यान, भारतीय हवामान विभागाने विदर्भातील जवळपास सर्वच जिल्ह्यांसाठी 'हाय अलर्ट' जारी करत, अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. विदर्भासोबतच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्येही जोरदार पावसाची शक्यता आहे.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/OR0iV3k
पुढील 24 तासांत मुसळधार पावसाचा इशारा:मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह कोसळणार धारा, विदर्भातही हाय अलर्ट
September 17, 2025
0