तालुक्यातील गुणाई शिक्षण प्रसारकमंडळ कौळखेडद्वारा संचालीतराजीव गांधीतंत्रनिकेतनमहाविद्यालयाचेतत्कालीन प्राचार्यतथा तत्कालीनसंस्थाध्यक्षांंनी ७०विद्यार्थ्यांचेबनावट जातप्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, नॉनक्रिमीलीयर तयार करून शासनाची१४ लाख ४० हजार ४४० रुपयांचीफसवणूक केली. याप्रकरणीशनिवारी (२१ सप्टेंबर) रात्री उदगीरग्रामीण पोलिस ठाण्यात प्राचार्य असलेल्या संस्थाचालकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. २०१३ -१४ व २०१४ -१५ या कालावधीत राजीव गाधी तंत्रनिकेतन महाविद्यालय उदगीर येथे आरोपींनी राजीव गांधी तंत्रनिकेतनमहाविद्यालयात शिकणाऱ्या ७० विद्यार्थ्यांचे बनावट कागदपत्रकाढले. ही प्रमाणपत्रे खरीअसल्याची भासवून त्यावर बनावट शिक्के वापरुन शासनाची दिशाभूल केली .तसेच १४ लाख ४० हजार४४० रुपयांत शासनाची फसवणूककेली. याप्रकरणी नायब तहसीलदारविलास नामदेव सोनवणे यांच्याफिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात कलम ४२०, ४६४, ४६७,४६८, ४७१ प्रमाणे बापुराव राठोड(रा.उदगीर ता.उदगीर) यांच्याविरोधात गुन्हा नोंद झाला. राठोड माजी जि.प.सभापती बापूराव राठोड हे गुणाई शिक्षणप्रसारक मंडळ कौळखेड व्दारासंचालीत राजीव गांधी तंत्रनिकेतनमहाविद्यालय उदगीर यामहाविद्यालयाचे संस्थाचालक वप्राचार्य आहेत. तसेच लातूर जिल्हापरिषदेचे माजी सभापती तथा भाजपपदाधिकारी आहेत. तसेच ऑलइंडिया बंजारा सेवा संघाच्या महाराष्ट्रप्रदेशाध्यक्षपदी दोन महिन्यापूर्वीचत्यांची निवड करण्यात आली आहे.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/LI0p2E6
70 विद्यार्थ्यांचे खोटे प्रमाणपत्र सादर करून शासनाला 14 लाखांचा गंडा:उदगीरच्या राजीव गांधी तंत्रनिकेतनमधील प्रकार, संस्थाचालकावर गुन्हा
September 21, 2025
0