Type Here to Get Search Results !

संघाची दहा तोंडे दहा दिशेने, सर्व प्रतिगामित्वात दडलेली:निसर्ग व नियती त्यांना सुबुद्धी देवो, हर्षवर्धन सपकाळ यांचा खोचक टोला

संघाची दहा तोंडे दहा दिशेनेच नाही तर सर्व प्रतिगामित्वामध्ये दडलेली आहेत त्याचा धिक्कार व दहन करावे, अशी आमची अपेक्षा आहे, असा खोचक सल्ला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे. तसेच संघाला आमचे निवेदन सांगितलेले आहे. निसर्ग व नियती त्यांना सुबुद्धी देवो ही प्रार्थना करत आहे. दसऱ्याला रावणाचे दहन केले जात ते एका व्यक्तीचे नाही तर प्रवृत्तीचे दहन असते, असेही सपकाळ म्हणाले. नागपूर येथील दीक्षाभूमीवरून सकाळी 6 वाजता राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धव सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली संविधान सत्यागग्रह पदयात्रेची सुरुवात झाली. यावर हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, संविधानाला अभिप्रेत असलेल्या भारतासाठी हातात हात घालून सर्वभारतीयांनी काम करावे आणि संविधानाचे सत्य सर्वदूर पसारावे हाच या पदयात्रेमागचा हेतू आहे. तुषार गांधी म्हणाले, लोकशाही व संविधान व लोकांच्या सत्याग्रहाचा अधिकार यासाठी ही पदयात्रा आयोजित करण्यात आली असून हा जनतेचा आक्रोश आहे. या पदयात्रेत महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे नेते पदाधिकारी व सर्वसामान्य जनता यात सहभागी झालेली आहे. सरन्यायाधीशांच्या मातोश्री RSS च्या व्यासपीठावर जाणार दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अमरावती महानगरतर्फे 5 ऑक्टोबर रोजी विजयादशमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे निमंत्रण सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्री कमलताई गवई यांना देण्यात आले आहे. त्यानुसार त्यांचे नाव कार्यक्रम पत्रिकेवरही छापण्यात आले आहे. कमलताई गवई यांनी संघाचे निमंत्रण स्वीकारले आहे. संघाशी वैचारिक मतभेद असले तरी एकमेकांच्या कार्यक्रमांना जाणे हे विचारांचा स्वीकार करणे नसते, असे राजेंद्र गवई यांनी या प्रकरणी सांगितले आहे. वाचा सविस्तर

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/FTqPUKM

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.