सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्री तथा माजी राज्यपाल दिवंगत रा. सू. गवई यांच्या पत्नी कमलताई गवई यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात जायचे की नाही, हा त्यांचा निर्णय असेल, असे त्यांचे सुपुत्र डॉक्टर राजेंद्र गवई यांनी सांगितले. कमलताई गवई यांनी संघाचे निमंत्रण स्वीकारले आहे. संघाशी वैचारिक मतभेद असले तरी एकमेकांच्या कार्यक्रमांना जाणे हे विचारांचा स्वीकार करणे नसते, असेही ते म्हणाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अमरावती महानगरतर्फे ५ ऑक्टोबर रोजी विजयादशमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे निमंत्रण सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्री कमलताई गवई यांना देण्यात आले आहे. त्यानुसार त्यांचे नाव कार्यक्रम पत्रिकेवरही छापण्यात आले आहे. पण त्यानंतर कमलताईंनी संघाच्या कार्यक्रमाला येण्यास कधीच होकार दिला नाही, हे संघाचे षड्यंत्र आहे, आपण पक्क्या आंबेडकरवादी आहोत, असे स्पष्टीकरण दिल्याचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यामुळे याविषयी संभ्रमावस्था निर्माण झाली. पण कमलताईंचे चिरंजीव डॉक्टर राजेंद्र गवई यांनी एका व्हिडिओद्वारे याबाबत खुलासा करून आईसाहेबांना निमंत्रण आल्याचे मान्य केले.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/jNL9ZAW
संघाशी वैचारिक मतभेद:तरी कार्यक्रमांना जाणे हे विचारांचा स्वीकार करणे नसते- राजेंद्र गवई, आईसाहेबांच्या निर्णयामागे मुलगा म्हणून त्यांच्या पाठीशी उभा
September 29, 2025
0