Type Here to Get Search Results !

गृहमंत्री अमित शहा शिर्डीत:मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्र्यांसह अर्धा डझन मंत्र्यांची उपस्थिती

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शनिवारी रात्री शिर्डीत मुक्कामी आले. विमानतळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले. रविवारी त्यांचा शिर्डी, लोणी - कोपरगाव दौरा होणार आहे. त्यांच्यासमवेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील अर्धा डझनावर दिग्गज मंत्री सहभागी होतील. या दौऱ्यात फडणवीस, शिंदे व पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहळ, महसूलमंत्री बावनकुळे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे, ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह मान्यवर उपस्थित राहतील. रविवारी सकाळी ११ वाजता गृहमंत्री शहा, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री श्री साईबाबांच्या मंदिरात दर्शन घेतील. त्यानंतर लोणी येथे प्रवरानगर कारखान्याच्या विस्तारीकरणाचे लोकार्पण, पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील आणि पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण, शेतकरी मेळावा होणार आहे. दुपारी ३ वाजता कोपरगावच्या संजीवनी कारखान्यात कॉम्प्रेस बायोगॅस प्रकल्पाचे लोकार्पण होईल. ४.४० वाजता ते दिल्लीकडे प्रयाण करतील.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/i1fBnAK

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.