Type Here to Get Search Results !

अमित शहा महाराष्ट्रात आले पण शेतकऱ्यांबद्दल बोलले नाहीत:CM-DCM चे शहांसमोरील मौन शेतकऱ्यांचा अपमान, काँग्रेसची टीका

राज्यात अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असतानाही महायुती सरकारने आजपर्यंत मदतीचा एक रुपयाही दिलेला नाही. केवळ कोरड्या घोषणा करून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्रात येऊनही त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर एकही शब्द उच्चारला नाही आणि मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री सुद्धा गप्प बसले, हा शेतकऱ्यांचा घोर अपमान आहे, अशी तीव्र टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. नागलोक कामठी येथे काँग्रेसच्या दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिराची सांगता आज झाली. कार्यशाळेत शहरी राजकारण, बदलते राजकारण आणि जनसंपर्क यांसारख्या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिरात माजी महापौर, शहराध्यक्ष, नगरसेवक आणि कार्यकर्त्यांचा सहभाग होता. कार्यशाळेच्या सांगता कार्यक्रमानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना हर्षवर्धन सपकाळ यांनी शेतकऱ्यांच्या मदतीवरून सरकारवर निशाणा साधला. नेमके काय म्हणाले हर्षवर्धन सपकाळ? राज्यातील अतिवृष्टीने शेतकऱ्याचे होते नव्हते, असे सर्व वाहून गेले आहे, पण भाजपा महायुती सरकारने अद्याप कवडीचीही मदत केली नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह अहिल्यानगरच्या दौऱ्यावर आले पण त्यांनी शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत एक शब्दही काढला नाही. भाजपा हा शेतकरी विरोधी पक्ष असून त्यांनी शेतकऱ्यांनाच वाऱ्यावर सोडले आहे, अशी टीका सपकाळ यांनी केली. CM-DCM चे मौन शेतकऱ्यांचा घोर अपमान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये तातडीने द्यावी, रब्बी हंगामासाठी बियाणे खते मोफत द्यावे व शेतकरी कर्जमाफी द्यावी या मागण्या काँग्रेस पक्षाने केल्या आहेत. पण राज्याचे मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह समोर तोंडही उघडले नाही, हा शेतकऱ्यांचा घोर अपमान असल्याचे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. शेतकरी मरत असतानाही भाजपा सरकार मदत करत नाही. हे अंत्यत दुर्दैवी आहे. तातडीने मदत जाहीर करावी याचा पुनरुच्चार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी केला. कार्यशाळेत विविध विषयांवर मार्गदर्शन दरम्यान, काँग्रसेच्या वतीने आयोजित दोन दिवसीय कार्यशाळेत शहरी राजकारण, बदलते राजकारण आणि जनसंपर्क यांसारख्या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी विजय वडेट्टीवार, डॉ. नितीन राऊत यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते. शहरी भागात काँग्रेसची उभारणी करण्यासाठी कार्यकर्त्यांचे जाळे उभारणे, मतदारांशी नियमित संवाद ठेवणे आणि जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी उपाययोजना राबविणे, यावर भर देण्याचे आवाहन करण्यात आले. या शिबिरात माजी महापौर, शहराध्यक्ष, नगरसेवक आणि कार्यकर्त्यांचा सहभाग होता. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार , माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी या कार्यशाळेला मार्गदर्शन केले.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/A4V36Ra

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.