राज्यातील व्यापारी आणि ग्राहकांसाठी राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे राज्यातील दुकाने, हॉटेल्स आणि इतर आस्थापना आता 24 तास उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारच्या उद्योग विभागाने यासंदर्भातला शासन निर्णय जारी केला आहे. या निर्णयामुळे राज्यातील व्यापारी व्यवहारांना नवे बळ मिळण्याची आणि ग्राहकांना दिवस-रात्र सेवा उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. या आस्थापनांना सूट नाही या नवीन नियमांमधून मद्यपान गृहे, बार, परमिट रूम, हुक्का पार्लर आणि देशी बार यांसारख्या आस्थापनांना वगळण्यात आले आहे. या वगळलेल्या आस्थापना वगळता इतर सर्व दुकाने आणि खाद्यगृहे आता 24 तास सुरू ठेवता येणार आहेत. कर्मचारी हक्क आणि साप्ताहिक सुट्टी बंधनकारक आस्थापनांना 24 तास सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली असली तरी, कर्मचाऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी महत्त्वपूर्ण अटी ठेवण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियम) अधिनियम, 2017 च्या कलम 16 (1) (ख) नुसार, आस्थापना आठवड्यातील सर्व दिवस सुरू ठेवता येईल, मात्र प्रत्येक कर्मचाऱ्याला आठवड्यातून एकदा सलग 24 तासांची साप्ताहिक सुट्टी देणे बंधनकारक राहील. शासनाच्या अधिसूचनेतून वेळ निश्चित महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम, 2017 च्या कलम 11 नुसार, राज्य सरकारला विविध आस्थापनांसाठी सुरू आणि बंद करण्याची वेळ निश्चित करण्याचा अधिकार आहे. सरकारने 19 डिसेंबर 2017 रोजी काढलेल्या अधिसूचनेनुसार, परमिट रूम, बिअर बार, डान्सबार, हुक्का पार्लर आणि मद्य विक्री करणाऱ्या दुकाने यांच्याच वेळा निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यानंतर 31 जुलै 2019 रोजी थिएटर आणि सिनेमा गृहांना या यादीतून वगळण्यात आले होते.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/AjPZoBp
राज्य सरकारचा मोठा निर्णय:आता हॉटेल्स, दुकाने आणि आस्थापना 24 तास सुरू ठेवता येणार; कोणत्या आस्थापनांना सूट नाही?
October 01, 2025
0