मनसेप्रमुख राज ठाकरे आज सहकुटुंब उद्धव ठाकरे यांच्या 'मातोश्री' निवासस्थानी पोहोचले आणि त्यांनी स्नेहभोजन केले. मागील भेटीत उद्धव ठाकरे 'शिवतीर्था'वर राज ठाकरे यांना भेटायला गेले होते. आज राज ठाकरे सहकुटुंब मातोश्रीवर दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात वेगळ्याच चर्चांना उधाण आले आहे. या कौटुंबिक भेटीमुळे मनसे आणि शिवसेना ठाकरे गट यांच्या संभाव्य युती संदर्भातही जोरदार तर्कवितर्क लढवले जात आहेत. या भेटीवर प्रतिक्रिया देताना मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी राजकीय टीका टिप्पणीवर भाष्य करण्यास नकार दिला. त्यांनी स्पष्ट केले की, ठाकरे परिवारावर संपूर्ण महाराष्ट्राचे प्रेम आहे, तसेच इतर भाषिक लोकांचेही प्रेम आहे. त्याचप्रमाणे, ठाकरे परिवाराचेही लोकांवर प्रेम आहे. दरम्यान, मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीसंदर्भात निर्माण झालेल्या चर्चांवरही नांदगावकर यांनी सूचक विधान केले आहे, ज्यामुळे भविष्यातील राजकीय समीकरणांबद्दल उत्सुकता वाढली आहे. पत्रकारांशी बोलताना बाळा नांदगावकर म्हणाले, युती होणार की नाही याला अर्थ काही अर्थ नसतो, जोपर्यंत त्या दोन भावांचे ऑफिशियल होत नाही तोपर्यंत भाष्य करणे योग्य होणार नाही. पण असे दिसते आहे की त्या दिशेने वाटचाल सुरु झालेली असावी असे मला दिसते, दोघांची मन जोडलेली असावी, असे नांदगावकर म्हणाले. एकमेकात विश्वास निर्माण होणे गरजेचे पुढे बोलताना बाळा नांदगावकर म्हणाले, मला मनापासून आनंद झाला आहे ठाकरे परिवारातले दोन बंधू एकमेकांना भेटले. गेल्या दोन-तीन महिन्यात ते सतत भेटत आहेत. माननीय प्रबोधनकार आणि माननीय बाळासाहेब ठाकरे परिवातील दोन ठाकरे बंधू यांची आज भेट झाली आहे. काही लोक ठाकरे परिवारावर प्रेम करत नसले जे इतर भाष्य करतील. जे बाळासाहेबांच्या कुटुंबावर प्रेम करतात अशा सर्वांना आनंद झाला आहे. गेल्या 19 ते 20 वर्षात दोन भावंडात संवाद नव्हता आता जो संवाद होत आहे. एकमेकात विश्वास निर्माण होणे गरजेचे आहे. एकमेकांची मन जुळली तर पुढे चांगले होते, म्हणूनच उद्धव ठाकरे जेवायला जातात राज ठाकरे त्यांच्या घरी जेवायला जातात. आम्हाला याचा निश्चित आनंद आहे. सगळ्या गोष्टीला राजकारणाच्या दृष्टिकोनातून पाहणार का? सगळ्या गोष्टीला राजकारणाच्या दृष्टिकोनातून पाहणार का? राजकारणाच्या पलीकडे जाऊन पाहण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्रात आपण पाहतो की सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आपण नातीगोती पाहत असतो. राजकारणात मी एकमेकावर टीकाटिप्पणी करतो सभागृहात करतो रस्त्यावर लढाई लढतो आम्ही आमचा सुसंवाद सोडलेला नाही. आज दोघे भाऊ भेटले म्हणजे दोन पक्षाचे नेते भेटले म्हणजे चर्चा तर होणारच राजकारणावरही चर्चा झाली असेल, अशी बाळा नांदगावकर यांनी म्हटले. बाळा नांदगावकर म्हणाले, आपण राजकीय पक्ष जे निर्माण केले आहेत ते लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी. उद्या ठाण्यात मोर्चा निघणार आहे. तिकडे कार्यकर्ते असतील. उद्याच्या ठाण्याच्या मोर्चात शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही सामील होऊ शकतो. मनसेच्या वतीने दीपोत्सव होतो. या दृष्टीने कदाचित चर्चा झाली असेल, असे नांदगावकर म्हणाले.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/652UKvx
राज ठाकरे सहकुटुंब 'मातोश्री'वर:ठाकरे बंधूंच्या भेटीवर बाळा नांदगावकरांचे सूचक विधान, म्हणाले- युतीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली असावी
October 12, 2025
0