साताऱ्यातील शासकीय विश्रामगृहात शुक्रवारी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीनंतर मांसाहारी जेवणाचा बेत होता. वसुबारस असताना मांसाहारी जेवण ठेवल्याने आणि कार्यकर्त्यांनी मटणावर यथेच्छ ताव मारल्याने सोशल मीडियावर भाजपला ट्रोल केले जात आहे. साताऱ्यातील शासकीय विश्रामगृहात झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीला खासदार उदयनराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आमदार तथा भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष डॉ. अतुल भोसले, आमदार मनोज घोरपडे, भाजप प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम असे मातब्बर उपस्थित होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठकीत चर्चा झाली. सोशल मीडियावर ट्रोलिंग या बैठकीत पक्ष संघटन रचनेचा आढावा घेण्यात आला. बूथ पातळीवर कार्यकर्त्यांना सक्रिय करण्यासाठी नियोजन सादर करण्यात आले. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठीची रणनीती आखण्यात आली. मात्र, बैठकीनंतर भाजपसारख्या हिंदुत्ववादी पक्षाने मांसाहारी जेवण ठेवल्याने सोशल मीडियात भाजपवर टीका होत आहे. मांसाहार कार्यकर्त्यांनी केला, पण सारवासारव करण्याची वेळ नेत्यांवर आली. विरोधकांच्या हाती आयते कोलीत भाजपा कोअर कमिटी बैठकीनंतरच्या मांसाहारी जेवणामुळे भाजपची मोठी अडचण झाली आहे. वसुबारस असल्यामुळे भाजप नेते गोमातेचे पूजन करून बैठकीला आले होते. मात्र, कार्यकर्त्यांसाठी मांसाहारी जेवण ठेवल्याने विरोधकांच्या हाती आयतेच कोलीत मिळाले आहे. मांसाहारी जेवणावळीवरून विरोधक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपची कोंडी करणार असल्याचे चित्र दिसत आहे.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/GMEu0kB
साताऱ्यात वसुबारसदिनी भाजप कार्यकर्त्यांचा मटणावर ताव:कोअर कमिटीच्या बैठकीनंतर पडली पंगत, सोशल मीडियावर ट्रोलिंग
October 18, 2025
0