सिंधुदुर्गातील ठाकरेंचे मोठे नेते आणि माजी आमदार राजन तेली यांनी दसऱ्याच्या दिवशीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला आहे. गोरेगाव येथील नेस्को मैदानावर झालेल्या शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात पक्षप्रवेश पार पडला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेला हा पक्षप्रवेश उद्धव ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. या बालेकिल्ल्यात गेल्या काही दिवसांत ठाकरे गटाला सलग धक्के बसत आहेत. अनेक स्थानिक नेत्यांनी ठाकरेंची साथ सोडून शिंदे यांच्या गटात प्रवेश केला आहे. आता राजन तेली यांनी देखील धनुष्यबाण हाती धरला आहे. नारायण राणेंचे खंदे समर्थक ते कट्टर विरोधक असा राजन तेलींचा राजकीय प्रवास राहिला आहे. विधानसभेला केसरकरांकडून राजन तेलींचा पराभव नारायण राणे यांचे एकेकाळचे समर्थक असलेल्या तेली यांनी 2024 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमधून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. पक्षप्रवेशानंतर उद्धव ठाकरे यांनी राजन तेली यांना सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. मात्र त्यांना शिवसेनेचे दीपक केसरकर यांच्याकडून पराभव स्वीकारावा होता. त्यानंतर ते उद्धव ठाकरे गटाचे सक्रिय नेते म्हणून कार्यरत राहिले. मात्र अखेर दसऱ्याच्याच मेळाव्याच्या दिवशी त्यांनी एकनाथ शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले. राणेंचे खंदे समर्थक ते कट्टर विरोधक असा तेलींचा प्रवास शिवसेनेतून राजकारणाचा श्रीगणेशा करणाऱ्या राजन तेली यांनी नारायण राणे यांच्यासोबत शिवसेना सोडली. मग ते काँग्रेसमध्ये गेले. नारायण राणे यांचे खंदे समर्थक ते कट्टर विरोधक असा तेली यांचा प्रवास राहिला आहे. काँग्रेसमधून ते भाजपमध्ये गेले. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली. मग ते ठाकरेंच्या शिवसेनेत गेले आणि आता ते शिंदे गटात दाखल झाले आहेत. कोण आहेत राजन तेली?
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/uXp6vQS
उद्धव ठाकरेंना कोकणातील मोठे खिंडार:सिंधुदुर्गातील नेते राजन तेली शिंदेंच्या शिवसेनेत दाखल, दसरा मेळाव्यात झाला पक्षप्रवेश
October 02, 2025
0