राज्य सरकारने 2 सप्टेंबर रोजी लागू केलेल्या कुणबी-मराठा आरक्षणासंदर्भातील शासन निर्णयाविरुद्ध दाखल याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. या सुनावणीत न्यायालयाने याचिकाकर्त्यांची मागणी फेटाळून लावत संबंधित 'जीआर'ला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. या निर्णयामुळे मनोज जरांगे पाटील यांनी समाधान व्यक्त केले असले तरी, ओबीसी नेत्यांनी नाराजी दर्शवली आहे. उच्च न्यायालयाच्या या निर्णयावर प्रतिक्रिया देताना अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी जरांगे पाटील यांच्यावर टीका केली, तसेच या प्रकरणावर आपली कायदेशीर भूमिका स्पष्ट केली आहे. स्थगिती कायमस्वरूपी नाकारलेली नाही उच्च न्यायालयाच्या निर्णयावर बोलताना अॅड. सदावर्ते म्हणाले, उच्च न्यायालयाने कायमस्वरूपी स्थगिती दिलेली नाही, असे नाही. एक 'दर्शनिक कारण' दाखवावे लागेल, तेव्हा स्थगिती दिली जाईल. त्यांनी कोर्टाला विनंती केली की, एक 'लेजिस्लेचर चॅलेंज' सुरू आहे आणि दुसऱ्या शासन निर्णयामुळे दुसरे प्रकरण आले आहे. त्यामुळे हे दोन्ही प्रकरण एकाच न्यायमूर्तींकडे वर्ग करण्यात यावेत. मनोज जरांगे पाटलांवर सडकून टीका यावेळी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी आरक्षणाच्या मुद्यावरून मनोज जरांगे पाटील यांच्यावर सडकून टीका केली. ते म्हणाले, आरक्षण हे राजकारण नाही, जरांगे हे 'ठिगळ' लावत आहेत. राजकारणात वेगवेगळे फॅक्टर काम करतात. मराठेतर जे मुख्यमंत्री असतात, तेव्हा शरद पवारांसारखे लोक फाटले की ठिगळ लावण्याचे काम करतात. सगळ्या पक्षातले मराठे नेते एकत्र येताना दिसत आहेत, पण कायदा 'डाइल्यूट' करता येत नाही. छगन भुजबळ जे करत आहेत ते अत्यंत योग्य आहे, काळाची गरज आहे. शिवसेना ही एकनाथ शिंदेंकडेच राहील पुढे बोलताना गुणरत्न सदावर्ते म्हणाले, दिल्लीत सरन्यायाधीशांवरील रोष व्यक्त करताना झालेले वर्तन चुकीचे होते. घोषणाबाजी करणे हे भावनिक होते. व्यक्त होणे मानवी स्वभाव आहे, पण व्यक्त होताना काळजी घेणे गरजेचे आहे. पुढे बोलताना गुणरत्न सदावर्ते यांनी गाणे गाऊन आपली प्रतिक्रिया दिली. त्यांनी स्पष्ट केले की, उद्धव ठाकरे यांच्यासोबत आमदार-खासदार नाहीत, ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत आणि शिवसेना ही एकनाथ शिंदे यांच्याकडेच राहील.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/3W4LftN
मराठा आरक्षणाच्या जीआरला हायकोर्टाकडून स्थगिती नाही:गुणरत्न सदावर्ते यांची प्रतिक्रिया; म्हणाले- आरक्षण हे राजकारण नाही, जरांगे हे 'ठिगळ' लावत आहेत
October 07, 2025
0