बार्टीतर्फे नांदेडला साहित्यरत्नअण्णा भाऊ साठे साहित्यसंमेलनाचे आयोजन करण्यातआले होते. रविवारी डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात रविवारी हेसंमेलन झाले. संमेलनात खासदार अशोक चव्हाण यांचे भाषण सुरु असताना, अनुसूचित जातीआरक्षण उपवर्गीकरणाच्यामागणीवरून लोकस्वराज्यआंदोलन संघटनेच्या कार्यकर्त्यांनीघोषणाबाजी केली.आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचेकाय झाले? असा जाब विचारला. आरक्षण उपवर्गीकरण लागू न केल्यास आंदोलन : पवार निवृत्त न्या. अनंत बदर समितीलादिलेली अनावश्यक मुदतवाढतत्काळ रद्द करा, अनुसूचित जातीआरक्षणाचे उपवर्गीकरण तत्काळलागू करा, अन्यथा आणखी तीव्रआंदोलन करण्यात येईल, असेलोकस्वराज्य संघटनेचे पदाधिकारीरावसाहेब पवार यांनी सांगितले.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/m2SsoiI
नांदेडला खासदार चव्हाणांच्या भाषणात आरक्षण उपवर्गीकरणासाठी घोषणाबाजी:लोकस्वराज्य आंदोलन संघटनेचे पदाधिकारी आक्रमक, पोलिसांची मध्यस्थी
October 12, 2025
0