सातारा जिल्ह्यातील नऊ नगरपालिका आणि एका नगरपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अर्ज दाखल केलेल्या 1726 उमेदवारांपैकी 1053 उमेदवारांनी नेत्यांच्या शिष्टाईला मान देत माघार घेतल्याने 233 नगरसेवक पदांसाठी 673 उमेदवार रिंगणात राहिले आहेत. यामध्ये काही ठिकाणी दुरंगी, तर काही ठिकाणी बहुरंगी लढती होणार आहेत साताऱ्यात नगरसेवकांच्या 50 जागांसाठी 178 उमेदवार तर नगराध्यक्ष पदासाठी 9 उमेदवार रिंगणात आहेत. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी माजी नगराध्यक्ष अशोक मोने, माजी उपनगराध्यक्ष शंकर माळवदे यांच्यासह शिवाजी भोसले, बाळासाहेब शिंदे, सुहास मोरे यांनी माघार घेतली. त्यामुळे महायुतीचे उमेदवार अमोल मोहिते, महाविकास आघाडीच्या सुवर्णादेवी पाटील यांच्यासह अपक्ष मिळून ९ जण नगराध्यक्ष पदाच्या रिंगणात राहिले आहेत. वाई मध्ये राष्ट्रवादीला मिळणार आव्हान वाई नगरपालिकेची निवडणूक चुरशीची ठरणार आहे. येथे राष्ट्रवादीला कट्टर लढत मिळणार आहे. राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी लढत होत असून 22 जागांसाठी 61 उमेदवार रिंगणात उरले आहेत. सर्वपक्षीय उमेदवारांनी आज माघार घेतली. महाविकास आघाडीतून तेजपाल वाघ व शिवसेनेचे प्रवीण शिंदे भाजपचे विजय ढेकणे यांनी नगराध्यक्ष पदाच्या रेस मधून माघार घेतली. फलटणमध्ये राजे गटाला पारंपारिक आव्हान फलटण नगरपालिकेसाठी रामराजे नाईक निंबाळकर यांचे चिरंजीव अनिकेत राजे यांना माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे बंधू समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी आव्हान दिले आहे. येथे 27 नगरसेवकांच्या जागेसाठी 76 जण रिंगणात आहेत .नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदासाठी एकूण 78 जण रिंगणात असून 31 जणांनी आज माघार घेतली आहे . महाबळेश्वरात नगराध्यक्ष पदासाठी तिरंगी लढत होत असून नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी अर्ज भरलेल्या एकूण 20 उमेदवारांनी आज माघारी घेतली राष्ट्रवादीकडून माजी नगरसेवक सुनील शिंदे लोक मित्र जनसेवा आघाडीचे माजी नगराध्यक्ष डी एम बावळेकर व अपक्ष उमेदवार माजी नगरसेवक कुमार शिंदे अशी तिरंगी लढत येथे होत आहे . रहिमतपूर येथे नगराध्यक्ष पदासाठी दुरंगी लढत पाहायला येथे मिळणार आहे 20 जागांसाठी 65 तन रिंगणात होते माघारी नंतर 40 जण रिंगणात उरले आहेत राष्ट्रवादी शिवसेना व काँग्रेस यांनी एकत्रित भाजप पुढे आव्हान उभे केले आहे .आता नंदना माने राष्ट्रवादी व मित्रपक्ष विरुद्ध वैशाली माने भाजप अशी समोरासमोर लढत होणार आहे पाचगणी मध्ये वीस जागांसाठी 118 चा निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते मात्र माघारी नंतर 75 जण रिंगणात उरले आहेत .एकूण 43 जणांनी नेत्यांच्या मध्यस्थीनंतर माघार घेतली मकरंद पाटील यांनी माजी उपनगराध्यक्ष दिलीप बगाडे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे माजी नगराध्यक्ष संतोष कांबळे यांचे बंधू दीपक कांबळे सुनील बगाडे सुनील कांबळे विजय वने दास चवरिया आणि अमोल सावंत हेही रिंगणात आहेत . मसवडला नगराध्यक्ष पदाच्या दोन उमेदवारांनी माघार घेतली आहे. पूजा विरकर भाजप , भुवनेश्वरीराजे माने राष्ट्रवादी व महाविकास आघाडी , रूपाली सरतापे बसपा या तिघी रिंगणात उरल्या आहेत नगरसेवक पदाच्या 20 जागांसाठी आता 46 उमेदवार उरले आहेत . कराडमध्ये 31 जागांसाठी 109 जण रिंगणात उरले आहेत. नगराध्यक्षपदासाठी नऊ जणांनी शड्डू ठोकला आहे. यामध्ये राजेंद्र सिंह यादव यशवंत विकास आघाडी व लोकशाही विकास आघाडी , विनायक पावस्कर भाजप व झाकीर पठाण काँग्रेस. , रणजीत पाटील यांच्यात मुख्य लढत होईल . मलकापूर मध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट , शिवसेना शिंदे गट आणि भाजप असा तिरंगी सामना रंगेल. भाजपचे तेजस सोनावले , राष्ट्रवादी व समविचारी पक्षांचे आर्यन कांबळे व शिवसेनेच्या वतीने अक्षय मोहिते यांची उमेदवारी कायम असून काँग्रेसचे संजय तडाखे यांनी निवडणुकीतून माघार घेतली. नगरसेवक पदाच्या 22 जागांमधील 42 जण रिंगणात उरले आहेत . मेढा नगरपंचायत निवडणुकीत भाजपचे दोन नगरसेविका बिनविरोधक नगराध्यक्ष पदामध्ये भाजप व शिवसेना दोघांमध्ये जोरदार टसल होणार आहे शुक्रवारी अर्ज माघारी घेतल्यानंतर स्पष्ट झाले आहे नगराध्यक्ष पदासाठी भाजपच्या उमेदवार रूपाली वारागडे व शिवसेनेच्या रेश्मा करंजेकर दोन प्रबळ उमेदवार असून राष्ट्रवादीच्या सुनीता पार्टी यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतला अपक्ष म्हणून माजी नगरसेविका शुभांगी गोरे यांचा अर्ज राहिला आहे मेढ्यात नगरसेवक पदाच्या 17 जागांसाठी 41 जण रिंगणात आहेत.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/VTruhmR
सातारा जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकांचे चित्र स्पष्ट:बहुरंगी लढतींमुळे नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
November 21, 2025
0