Type Here to Get Search Results !

दिल्लीचे बूट चाटणारे भगव्याच्या औलदीचे नाहीत:पालघरचा आरोपी दोषी नसेल तर भाजपने शिवसेना अन् हिंदूंची माफी मागावी - उद्धव ठाकरे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ शिवसैनिक वर्धापन दिन सोहळ्यात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हिंदुत्व आणि राजकीय निष्ठा यावरून अत्यंत आक्रमक टीका केली. शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरून त्यांनी 'दिल्लीचे बूट चाटणारे' असा टोला लगावला, तर भाजपने पालघर साधू हत्याकांडात काशिनाथ चौधरीचा समावेश नसेल, तर भाजप आणि देवेंद्र फडणवीसांनी हिंदूंची माफी मागावी, अशी थेट मागणी केली. उद्धव ठाकरे म्हणाले की, मी मुद्दाम ज्येष्ठ हा शिवसैनिक शब्द वापरला नाही. शिवसेना प्रमुखांनी सांगितले आहे की, माणूस वयाने म्हातारा होत नसतो, तर विचाराने थकतो. यातले अनेक शिवसैनिक बाळासाहेबांच्या बाजूला कवचासारखे असायचे. तुम्ही शिवसेना प्रमुखांसोबत होतात म्हणून आम्ही घरी निर्धास्त होतो. शिवसेनाप्रमुखांकडे बघायची तर हिम्मत कोणाची नव्हती. आताही कोणाकडे काठी हातात नाही, तेव्हा काय काय हातात होत हेच सर्वांना माहिती आहे. भाजप - फडणवीसांनी शिवसेनेची माफी मागावी पालघर येथे भाजपने त्या चौधरीला पक्षात प्रवेश दिला. भाजपने साधू हत्यांकाडातील आरोपी म्हणून किती बोंबाबोंब केली होती. तेव्हा मी मुख्यमंत्री असताना म्हणून शिवसेना कशी हिंदुत्वाच्या विरोधात आहे हे बेंबीच्या देठापासून बोंबलत होते. आता त्याच चौधरीला भाजपमध्ये प्रवेश दिला. हा हिंदुत्वाचा अपमान नाही. मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात स्थानिक पातळीवर चौकशी केली होती. तो चौधरी या हत्याकांडात सामील असेल तर प्रवेश का दिला? आणि नसेल तर प्रवेश का थांबवला? त्याचा संबंध नसेल तर भाजपने आणि देवेंद्र फडणवीसांनी चौधरीची, हिंदूंची आणि शिवसेनेची माफी मागितली पाहिजे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. संपूर्ण देशात आगडोंब उसळवायला निघाला होता, हत्यांकाड दुर्दैवी घटना होती. तोच चौधरी तुमच्याकडे आला की पवित्र झाला. धाराशिवमध्ये ड्रग्ज माफियाला नगराध्यक्षपदाचा उमेदवार केला, अशी टीका ठाकरेंनी केली. दिल्लीचे बूट चाटणारे भगव्याच्या औलदीचे नाहीत आपण मध्ये मध्ये बघतो ते दिल्लीचेही बूट चाटतात, ते भगव्याच्या औलदीचे नाहीत, गद्दार आहेत, अशी टीका उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर केली. इंडिया बैठकीचे आमंत्रण आले तर जातो, नाही तर खासदारांना भेटायला जातो. आता जे दिल्लीला जात आहेत, ते मुजरे मारायला तिकडे जातात. त्यांचे हुजरे काय विचार पुढे नेणार आहेत?, असा सवाल ठाकरेंनी केला. मशालीची उब घेतली, आता धग सोसा इतिहासाची पुनरावृत्ती होत असते असे म्हणतात. ज्यावेळी शिवसेना प्रमुखांचे ‘फटकारे’ हे पुस्तक आम्ही तयार करत होतो. त्यावेळी त्या कार्टूनमध्ये मशाल घेतलेला एक तरुण शिवसैनिक होता. त्याच्याशेजारी कमळ घेतलेला तेव्हाचा जनसंघ होता वाटतं. हीच निवडणूक निशाणी मशाल उगीच घेतलेली नाही. मोदी आणि शहांची आरती करायची असती तर उदबत्ती घेतली असती ना. आता तुम्ही मशालीची उब घेतली आता धग सोसा अशा शब्दात ठाकरे यांनी यावेळी भाजपावर टीका केली. टांगती तलवार कायम डोक्यावर ठेवायची उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, नुकताच अजित पवार यांच्या मुलाचा घोटाळा बाहेर आला. आता यांचे घोटाळे बाहेर येत आहे. कोणी काढला हा घोटाळा. आधी घोटाळे काढायचे नंतर क्लीन चीट देण्यासाठी देवेंद्र फडणवीस आहेतच. यांचे घोटाळे बाहेर काढायचे नंतर मापात राहा सांगायचे आणि टांगती तलवार कायम डोक्यावर ठेवायची असा सर्व प्रकार सुरु असल्याचे ठाकरे यावेळी म्हणाले. दुसऱ्याने केल्यास लव्ह जिहाद, भाजपने केल्यास अमर प्रेम उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, देश नासवून टाकला जातोय. मला भीती वाटतेय की अराजकेकडे जातोय कि आपण? कोणालाही पक्षात घेत आहेत. आमच्याकडे अनेक मुस्लीम कार्यकर्ते आहेत. दसऱ्याच्या भाषणात बोललेलो. आपण काही केले किंवा दुसऱ्यांनी केले तर लव्ह जिहाद भाजपने केले तर अमर प्रेम असे सुरु आहे.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/sy1LF4w

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.