Type Here to Get Search Results !

सत्य सांगण्याचा प्रयत्न करा, पण ‘राजा हरिश्चंद्र’ होऊ नका- उज्ज्वल:गुन्हेगारांचे प्रमाण वाढणार नाही याची काळजी वकिलांनी घेतली पाहिजे

‘वकिली व्यवसाय करणाऱ्या किंवा त्यात येऊ पाहणाऱ्या तरुणांचा स्वत:वर विश्वास असायलाच हवा, परंतु हा आत्मविश्वास फाजील नसावा. सत्य सांगण्याचा प्रयत्न करावा. मात्र सत्य सांगताना राजा हरिश्चंद्र होऊ नये. देशाच्या सार्वभौमत्वाला बाधा येणार नाही, गुन्हेगारांचे प्रमाण वाढणार नाही याचीही काळजी वकिलांनी घेतली पाहिजे,’ असा सल्ला विशेष सरकारी वकील, राज्यसभा खासदार अॅड. उज्ज्वल निकम यांनी दिला. मसापतर्फे शिवछत्रपती रंगभवन येथे बुधवारी त्यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. माधवराव देशपांडे यांनी त्यांना “माझा जीवनप्रवास जळगाव ते दिल्ली व्हाया मुंबई’ या विषयावर बोलते केले. पद‌्मश्री निकम यांनी व्यक्त केलेली मते त्यांच्याच शब्दांत... माझे बालपण कडक शिस्तीत गेले. वडील बॅरिस्टर, आजोबा पंढरपूरचे वारकरी. आई स्वातंत्र्यसैनिक होती. मी डॉक्टर व्हावे अशी आईची इच्छा पण वडिलांमुळे मी वकिली क्षेत्राकडे वळलो. वडिलांच्या कडक शिस्तीमुळे माझे पाय नेहमीच जमिनीवर असतात. डोक्यात कधीच उन्माद येऊ दिला नाही. मी १९७३ ला लॉची पदवी घेतली, १९७७ ला पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यानंतर १९७८ ला जळगाव गाठले. लग्न झाले नव्हते. काही काळातच प्रथितयश वकील म्हणून नावारूपाला आलो. जळगावमध्ये २८ वर्षे सरकारी वकील म्हणून काम केले. लोकसभेला मी उभा राहणारच नव्हतो माझ्या आयुष्यावर सहा महिन्यांत एक चित्रपट येतोय. अभिनेता राजकुमार राव माझी भूमिका करतोय. लोकसभेला उत्तर मध्य मुंबईच्या निवडणुकीत हरलो. पण ती माझी चूक होती, असे मी मानत नाही. खरे तर मी उभाच राहणार नव्हतो. पण पक्षाने माझे समुपदेशन केले. माझ्यासाठी मतदारसंघ नवा होता. अवाढव्य शक्ती प्रतिस्पर्धी होत्या, असेही त्यांनी सांगितले.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/2JL3YRk

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.