राज्यातील पंढरपूरनंतर सर्वात मोठा यात्रोत्सव असलेल्या संत एकनाथ महाराज यांच्या नाथषष्ठी मुख सोहळ्यास ९ मार्चपासून सुरुवात होत आहे. या महोत्सवासाठी यंदा प्रथमच तब्बल ७६५ हूनअधिक दिंड्या येणार असून, याची नोंद झाल्याची माहिती नाथ संस्थानचे कार्यकारी विश्वस्त दादा बारे यांनी दिली. तर, तीन दिवसीय नाथषष्ठी उत्सवाची सांगता ११ मार्च रोजी पारंपरिक काल्याच्या कीर्तनाने होणार असल्याची माहिती संत एकनाथ षष्ठी महोत्सव संस्थानचे अध्यक्ष तथा आमदार विलास भुमरे यांनी दिली. दिंडीप्रमुखांचा गौरव, छबिना सोहळा रंगणार मंगळवारी (१० मार्च) महोत्सवासाठी आलेल्या विविध दिंडींच्या प्रमुखांचा सत्कार संत एकनाथ मंदिर संस्थानचे अध्यक्ष व पैठणचे आमदार विलास भुमरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. रात्री पारंपरिक छबिना सोहळा भक्तांच्या उपस्थितीत पार पडेल.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/6Ob9RVe
तीन दिवस सोहळा:नाथषष्ठीनिमित्त पैठणला प्रथमच येणार 765 दिंड्या, विविध राज्यांतून येणार भाविक
March 06, 2026
0