Type Here to Get Search Results !

माणिकराव कोकाटेंसह सात मंत्र्यांच्या ओएसडीची नेमणूक:चुकीच्या कामात सहभागी असणाऱ्यांना मी मान्यता देणार नाही- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यातील मंत्र्यांचे पीएस आणि ओएसडी नेमणुकीवरून राष्ट्रवादीचे मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सडेतोड उत्तर दिले होते. त्यानंतर याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ओएसडी खाजगी सचिव नियुक्तीचे आरोप झाल्यानंतर तातडीने आज अनेक मंत्र्यांचे ओएसडी खाजगी सचिवांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. सध्या राज्यातील पाच मंत्र्यांचे ओएसडी आणि दोन मंत्र्यांच्या खासगी सचिवांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. तसेच अद्यापही अनेक मंत्र्यांच्या ओएसडी आणि खासगी सचिवांची नियुक्ती बाकी असून मंत्र्यांनी दिलेल्या नावाची छाननी करून मगच नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती आहे. मंत्री गणेश नाईक, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री आशिष शेलार, मंत्री माणिकराव कोकाटे आणि बाबासाहेब पाटील यांच्याकडे विशेष कार्य अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर मंत्री जयकुमार रावल आणि इंद्रनील नाईक यांच्या खासगी सचिवांची नियुक्तीचे सामान्य प्रशासन विभागाकडून आदेश जारी करण्यात आले आहेत. चुकीच्या कामात सहभागी असणाऱ्यांना मी मान्यता देणार नाही राष्ट्रवादीचे मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आपल्याला हवे असलेले ओएसडी आणि पीएस मिळत नसल्याचे सांगितले होते. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, पीएस आणि ओएसडी नेमण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांचा असतो. यासंदर्भातील प्रस्ताव मंत्री मुख्यमंत्र्याकडे पाठवतात, आणि अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतात. हे नव्याने होत नाही. कॅबिनेटच्या बैठकीत मी अगोदर सांगितले होते. तुम्हाला पाहिजे ते नाव पाठवा, मात्र ज्यांचे नाव फिक्सर म्हणून किंवा चुकीच्या कामात सहभागी असणाऱ्यांना मी मान्यता देणार नाही. कोणीही नाराज झाला तरी त्याला मान्यता देणार नाही. ओएसडीची यादी

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/5l90YRK

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.