गुरुवारी सायंकाळी ७ वाजता दरम्यान वरठी येथे एका भरधाव वेगाने येणाऱ्या टिप्परने दुचाकीला धडक दिल्याने एका ११ वर्षीय मुलीच्या जागीच मृत्यू तर दुचाकी चालक व एक मुलगा जखमी आहे. वरठी येथुन दुचाकी चालक बालु सेलोकर आपल्या लहान मुलीसह घराजवळच्या मुलाला ट्युशन वरून घरी एकलारी येथे जात असताना वरठी येथील रेल्वे पुलावर भंडारा कडे जात असेल्या भरधाव MH36 AJ1015 क्रमांकाच्या टिप्परने दुचाकीला धडक दिली. ही धडक एवढी जबर होती की, दुचाकीस्वार एकता बालु सेलोकर (वय ११ ) राहणार एकलारी या मुलीचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकी चालक तिचे वडील बालु सेलोकर (वय ४५) व विर कन्हैया मारवाडे (वय १२) हा मुलगाही गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर टिप्पर चालकाने पळ काढला. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी रोष व्यक्त करत गर्दी केली होती. बऱ्याच वेळानंतर पोलीस प्रशासनाने परिस्थितीवर नियंत्रण मिळवत मार्ग मोकळा केला. अपघातग्रस्त दुचाकी व ट्रक वरठी पोलीसांनी तब्येत घेतला असून पुढील तपास व कारवाई सुरू आहे. दरम्यान वरठी येथील सरपंच चांगदेव रघुते यांनी घडलेल्या घटनेबद्दल वरठी व एकलारी ग्रामपंचायतीच्या वतीने अवैध भरधाव वाहतूकीवर नियंत्रण मिळवावे, पुलावरील खड्डे बुजवून पुलाच्या दोन्ही बाजूला रेलिंग बसवावी व सामान्य नागरिकांकरिता रेल्वे उड्डाणपूल तयार करण्याच्या मागणी ला ठेवून ७ मार्च रोजी सकाळी रास्ता रोको करण्याचा इशारा दिला आहे.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/tNQFlvE
भरधाव टिप्परची दुचाकीला धडक:11 वर्षीय मुलीचा मृत्यू, दुचाकी चालक व एक मुलगा जखमी
March 06, 2025
0