महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार विविध योजना राबवत आहेत. या योजनांमुळे महिलांना स्वतःचे आर्थिक भविष्य सुरक्षित करण्याची संधी मिळत आहे. यातच गेल्या वर्षभरात लखपती दीदी योजनेचा महाराष्ट्रातील 18 लाखांहून अधिक महिलांना फायदा झाला आहे. दरम्यान राज्य सरकारने गतवर्षीच्या अर्थसंकल्पात 25 लाख महिलांना लखपती दीदी बनवण्याचे उद्दीष्ट ठेवले होते. राज्यात या योजनेअंतर्गत 11 फेब्रुवारीपर्यंत 18 लाख लखपती दीदी असल्याची माहिती खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली. या आकडेवारीच्या आधारे विचार केला तर सरकारने ठेवलेल्या उदीष्ठाच्या जवळपास 75 टक्क्याहून महिलांना या योजनेचा फायदा झाला आहे. 1 कोटी लखपती दीदी करण्याचा संकल्प- फडणवीस राज्यात आगामी कालावधीत 1 कोटी लखपती दीदी करण्याचा संकल्प आहे. सध्या राज्यात 18 लाख लखपती दीदी आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी केली आहे. उमेद च्या माध्यमातून 60 लाख पेक्षा अधिक कुटुंब आर्थिक प्रगती करत आहेत.या माध्यमातून बचत गटातील महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी शासन प्रयत्नशील असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘लखपती दीदी‘ही योजना आणली आहे. ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त आहे त्यांना 'लखपती दीदी' म्हटले जाते.आज महाराष्ट्रात 18 लाख पेक्षा जास्त 'लखपती दीदी'आहेत. मार्च 2025 पर्यंत 25 लाख महिलांना 'लखपती दीदी' करणार आहोत.आगामी कालावधीत 1 कोटी महिला लखपती दीदी करण्याचा संकल्प ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलून दाखवला. नेमके काय आहे योजना? आर्थिकदृष्ट्या वंचित महिलांना बिनव्याजी 5 लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देणे हे लखपती दीदी या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. या योजनेमुळे महिला आर्थिक अडचणींपासून मुक्त होऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास आणि वाढविण्यास सक्षम होणार आहेत. महिलांचा उद्योगात सहभाग वाढवण्यासाठी निर्णय गेल्या काही वर्षांपासून महिला सशक्तिकरणावर सरकारचा विशेष भर आहे. महिलांची आर्थिक, सामाजिक प्रगती व्हावी यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सरकारकडून लखपती दीदी ही योजना राबवली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2023 रोजी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरुन देशाला उद्देशून भाषण करताना 'लखपती दीदी' योजनेची घोषणा केली. उद्योग क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढावा हा उद्देश समोर ठेवून ही योजना चालू करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून सरकातर्फे महिलांना पाच लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज दिले जाते. काय आहे पात्रता? ही कागदपत्रे गरजेची असा करता येतो अर्ज लखपती दीदी योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर महिलांना बचत गटाच्या माध्यमातून एका उद्योगाचे नियोजन करावे लागेल. या उद्योगाचा आराखडा सरकारला पाठवला जाईल. या आराखड्याचा तसेच लखपती दीदी योजनेसाठीच्या अर्जाची सरकार पडताळणी करेल. त्यानंतर सर्व अटींची पूर्तता होत असेल तर महिलांना पाच लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाईल. 2024-25 आर्थिक वर्षात 26 लाख ‘लखपती दीदी’ राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन म्हणाले की, महिलांचे कौटुंबिक उत्पन्न वाढविण्यासाठी ‘लखपती दीदी’ उपक्रम राबवित आहे. आतापर्यंत, 17 लाखांपेक्षा जास्त महिलांनी, त्यांचे कौटुंबिक उत्पन्न एक लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिक वाढविण्यात यश मिळविले आहे. शासनाने, 2024-25 च्या अखेरपर्यंत 26 लाख ग्रामीण भागातील महिलांना ‘लखपती दीदी’ बनवून सक्षम करण्याचे ध्येय आहे. महिला कशा होणार लखपती? लखपती दीदी योजनेनुसार महिलांना वेगवेगळ्या प्रकारचे कौशल्य शिकवले जाणार आहेत. या ट्रेनिंगच्या दरम्यान महिलांना स्वत:चा व्यवसाय सुरु करण्यासाठीही टिप्स दिले जातील. त्याचबरोबर आर्थिक विषयांची माहिती देण्यासाठी वर्कशॉप्स, बिझनेस प्लॅन, मार्केटिंग, बजेट, सेव्हिंग आणि गुंतवणुकीची माहिती दिली जाते. त्याचबरोबर व्यवसासाठी तंत्रज्ञानाच्या वापरासह डिजिटल बँकिंग सर्विस, मोबाईल वॉलेट आणि फोन बँकिंगबद्दल देखील महिलांना प्रशिक्षण दिले जाते. जयकुमार गोरेंकडून बैठकांचा धडाका योजनेचा लाभ जास्तीत जास्त महिलांना व्हावा यासाठी मंत्री जयकुमार गोरे यांनी विभागवार बैठका घेतल्या आहेत. यावेळी बोलताना मंत्री गोरे म्हणाले की, बचत गटातील महिलांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या जिल्हा परिषदेच्या मालकीच्या जागेवर उमेद मॉल सुरू करण्याचा विचार असल्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले. भावी पिढ्यांना बळकटी योजना- पंतप्रधान मोदी जळगावमध्ये 25 ऑगस्ट 2024 11 लाख नवीन लखपती दीदींना त्यांनी प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आले. यावेळी पंतप्रधानांनी देशभरातील लखपती दीदींशी संवादही साधला. मोदी यांनी 2,500 कोटी रुपयांचा फिरता निधी जारी केला, ज्याचा 4.3 लाख बचत गटांच्या सुमारे 48 लाख सदस्यांना फायदा होणार आहे. त्यांनी 5,000 कोटी रुपयांचे बँक कर्ज देखील वितरित केले ज्याचा 2.35 लाख बचत गटांच्या 25.8 लाख सदस्यांना फायदा होणार असल्याची माहिती दिली. भारतातील महिला शक्तीने समाज आणि राष्ट्राचे भविष्य घडवण्यात नेहमीच योगदान दिले आहे. आज जेव्हा भारत विकसित होण्यासाठी प्रयत्नशील आहे, तेव्हा आपली स्त्रीशक्ती पुन्हा एकदा पुढाकार घेत आहे. तुम्हा सर्वांमध्ये मला राजमाता जिजाबाई आणि सावित्रीबाई फुले यांचे प्रतिबिंब दिसत आहे. लखपती दीदी मोहीम ही केवळ माता-भगिनींच्या उत्पन्नाला चालना देण्याचा मार्ग नसून कुटुंब आणि भावी पिढ्यांना बळकटी देणारी एक मोठी मोहीम आहे. यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कायापालट होत आहे. देशातील कोट्यवधी महिलांकडे कोणतीही मालमत्ता नाही त्यामुळे त्यांना लघु उद्योग सुरू करण्यासाठी बँक कर्ज मिळण्यात मोठा अडथळा निर्माण होत आहे. म्हणून, मी महिलांवरील ओझे कमी करण्याचे वचन दिले होते त्यासाठी ही योजना सुरू करण्यात आल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/qInesoF
राज्यात 18 लाखांहून अधिक 'लखपती दीदी':जाणून घ्या योजना आहे तरी काय? महिलांना कशी मिळते 5 लाख रुपयांपर्यंत मदत
March 05, 2025
0