सरपंच हत्या प्रकरणात निकटवर्तीयच गुंतल्याने धनंजय मुंडंेना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर देवगिरी बंगल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपल्या पक्षाचे मंत्री, आजी-माजी खासदार, आमदार, जिल्हाध्यक्षांची बैठक घेतली. आपल्यासोबत राहणाऱ्यांवर लक्ष ठेवा, तो काय काम करतो हे पाहा, त्याचे चारित्र्य तपासा, गैर-चुकीची कामे करणाऱ्यांना दूर ठेवा. महायुतीच्या आमदारांशी समन्वय साधून स्थानिक पातळीवर कामकाज करा, असा शिकवणी वर्ग त्यांनी घेतला. महामंडळापासून तर विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांपर्यंत प्रत्येक ठिकाणी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संधी मिळेल, असेही त्यांनी सांगितले. मंगळवारी रात्री झालेल्या या बैठकीस प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेही उपस्थित होते. आमदारांना लवकरच महत्त्वाच्या शासकीय समितीवर मिळणार स्थान विधिमंडळाच्या प्रमुख समित्यांमध्ये ५०:२५:२५ असा फॉर्म्युला राहील असेही पवारांनी सांगितल्याचे समजते. भाजपला ५० तर शिवसेना व राष्ट्रवादीला २५:२५ याप्रमाणे समित्यांवर प्रतिनिधित्व मिळणार आहे. या नियुक्त्या लांबवणार नाही मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना शासकीय समित्यात महत्त्वाची जबाबदारी देण्याचे ठरवले आहे. लवकरच महामंडळापासून तर विशेष कार्यकारी अधिकारी पदासाठी नियुक्ती होईल. मित्रपक्षाचा आमदार असणाऱ्या ठिकाणी त्यांना ५० टक्के तर अन्य दोन पक्षांना २५:२५ टक्के याप्रमाणे पदांचे वाटप होईल. या नियुक्त्या लांबणार नाहीत, असेही पवार म्हणाले. स्वगृही येणाऱ्या बंडखोरांशी जुळवून घ्या पुढील काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सभासद नोंदणीसाठी सर्व पदाधिकारी तसेच आजी-माजी आमदारांनी प्रयत्न करावे अशी सूचना पवारांनी केली. बंडखोरी करून महायुतीमधून अन्य पक्षांमध्ये गेलेल्यांना सामावून घेतले जाणार आहे. तेव्हा स्थानिक पातळीवरच्या वादाचे कंगोरे उद्भवता कामा नये अशी तंबीदेखील पवारांनी दिल्याचे पदाधिकाऱ्यांनी खासगीत सांगितले.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/vF2Q14g
सोबत राहणाऱ्यांंवर लक्ष ठेवा,गैर कामे करणाऱ्यांना दूर ठेवा- अजित पवार:मंत्री, आमदारांसह पदाधिकाऱ्यांचा मुंबईत घेतला विशेष शिकवणी वर्ग
March 05, 2025
0