Type Here to Get Search Results !

पुण्यात भररस्त्यात आलिशान गाडी थांबवून चौकात तरुणाची लघुशंका:बाप-लेकावर यापूर्वी सट्टेबाजी, खंडणीचे गुन्हे

पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील येरवडा पोलिस स्टेशनपासून १०० मीटर अंतरावर एका नामांकित व्यावसायिकाचा मुलगा गौरव आहुजाने भररस्त्यात आलिशान कार थांबवली. त्यानंतर दारूच्या नशेत कारचा दरवाजा उघडाच ठेवून खाली उतरून त्याने भरचौकात लघुशंका केली. त्याचा मित्र दारूची बाटली घेऊन कारमध्ये बसला होता. याचा व्हिडिओ एक नागरिक बनवत असताना गौरवने अश्लील कृत्य करत बीएमडब्ल्यू कार (एमएच १२ आरएफ ८४१९) भरधाव दामटली. ही घटना शनिवारी सकाळी साडेसात वाजता घडली. दरम्यान, गौरव आहुजा याच्यासह त्याचे वडील मनोज आहुजा यांच्यावर यापूर्वी क्रिकेट सट्टेबाजी, खंडणी असे गुन्हे दाखल असून त्यांना यापूर्वी अटकदेखील झालेली होती. गौरव आहुजा याच्या तीन पिढ्यांनी बेकायदेशीर लॉटरी व्यवसाय केला असून त्यातून पैसा मिळवलेला आहे. दरम्यान, गौरव आहुजा व भाग्येश ओसवल यांना अटक करण्यात आली असून वैद्यकीय चाचणी करण्यात येणार आहे. २०२१मध्ये क्रिकेट बेटिंगचा गुन्हा उघडकीस आला होता. यामध्ये पैसे हरलेल्या एका हॉटेल व्यावसायिकाला पोलिस कर्मचाऱ्याचा मुलगा अजय शिंदे व सचिन पोटे आणि गौरव आहुजा यांनी धमकावून अडीच लाख रुपयांची खंडणी मागितली होती. काही पालक आपल्या चुकांवर पांघरूण घालतात : डॉ. गोऱ्हे या प्रकरणावर विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत सांगितले की, ही घटना केवळ पुण्यापुरती मर्यादित नसून संपूर्ण राज्यात अशा प्रकारच्या बेशिस्त आणि मुजोर वर्तनाची समस्या वाढत आहे. पैशाची गुर्मी आणि नशेच्या आहारी गेलेले काही तरुण समाजकंटकासारखे वागत आहेत. पोलिसांनी कठोर कारवाई केली पाहिजे. वडील म्हणाले, मुलाने माझ्याच तोंडावर लघुशंका केली पोलिसांनी चौकशीसाठी मुलाचे वडील मनोज आहुजा यांना ताब्यात घेतले. ते म्हणाले, माझ्या मुलाने केलेले कृत्य निषेधार्ह असून त्याच्या कृत्यामुळे आमचीदेखील बदनामी झाली आहे. गौरव हा माझा मुलगा असल्याची मला लाज वाटत असून त्याने चौकातील सिग्नलवर नाही तर माझ्या तोंडावर लघुशंका केली आहे. संबंधित गाडी माझ्या नावावर असून मुलगा बेपत्ता असल्याचे ते म्हणाले.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/4XQRYUa

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.