धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला, असे आम्ही मानत नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे. कारण मुख्यमंत्र्यांनी सभागृहात याबाबत माहिती देणे अपेक्षित होते, मात्र 5 दिवस होऊनही ते याबाबत सभागृहात काही बोलले नाहीत, असे जयंत पाटील म्हणाले. याशिवाय त्यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला. जयंत पाटील यांनी पुन्हा एकदा राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. पोलिसांना हाताशी धरून रोज गुन्हे करण्याची नवीन पद्धत सुरू झाली असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे. यावेळी त्यांनी मंत्री जयकुमार गोरे यांनी पाठलेल्या हक्कभंग नोटीसीवरही प्रतिक्रिया दिली. नेमके काय म्हणाले जयंत पाटील? धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला, असे आम्ही मानत नसल्याचे म्हणाले. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती देणे अपेक्षित होते, मात्र पाच दिवस झाले त्यांनी अजूनही त्यावर वक्तव्य केले नाही. त्यामुळे हा राजीनामा झाला असे आम्ही मानत नाही, असे जयंत पाटील म्हणाले. पोलिसांना धागेदोरे सापडले तर ते धनंजय मुंडेंवर देखील गुन्हा दाखल करू शकतात. मला माहित नाही की पोलिसांजवळ काय माहिती आहे, असेही ते म्हणालेत. फडणवीस-शिंदेंमध्ये शीतयुद्ध पोलिसांना हाताशी धरून रोज गुन्हे करण्याची नवीन पद्धत सुरू झाली आहे, पोलिसांना गुन्हा होण्याच्या आधीच माहिती असते हे मी अनेक ठिकाणी ऐकले आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्थेची अतिशय वाईट परिस्थिती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांमध्ये कदाचित शीतयुद्ध चालू असल्याचे दिसते, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. राऊतांवर हक्कभंग लागू होईल, असे वाटत नाही मंत्री जयकुमार गोरे यांनी सभागृहात हक्क भंग मांडल्यामुळे राज्याला याची माहिती झाली, नाही तर फक्त मीडिया पुरतीच ही माहिती राहिली असती. मात्र त्यांनी स्वतःहून ही माहिती सभागृहाला दिली. आता हे प्रकरण हक्कभंग समितीकडे जाईल आणि हक्क भंग समिती निर्णय घेईल. परंतु सभागृहाबाहेर बोललेली ही गोष्ट आहे. त्यामुळे संजय राऊत यांच्यावर हक्क भंग लागू होईल, असे वाटत नाही. महाविकास आघाडीच्या बैठकीत जयकुमार गोरे यांच्या राजीनाम्याबाबत ठरेल, असे जयंत पाटील म्हणाले.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/oHaMsbO
आम्ही धनंजय मुंडेंचा राजीनामा मानत नाही:कारण मुख्यमंत्र्यांनी सभागृहात माहिती देणे अपेक्षित होते, पण तसे झाले नाही - जयंत पाटील
March 08, 2025
0