वसमत तालुक्यातील गुंज येथील मयतांच्या कुटुंबीयांच्या मागण्या शासनाकडे कळवण्याचे तहसीलदार शारदा दळवी यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर पाच मृतदेहावर शुक्रवारी ता. ४ रात्री आकरा वाजण्याच्या सुमारास गुंज येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. एका मृतदेहावर देळुब येथे अंत्यसंस्कार झाले, तर एका मयताचे नातेवाईक आले नसल्याने रात्री उशीरा अंत्यसंस्कार होणार असल्याचे सांगण्यात आले. वसमत तालुक्यातील गुंज येथील महिला मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत पडल्याने सात महिलांचा मृत्यू झाला. हिंगोली व नांदेडच्या प्रशासनाने घटनास्थळी दाखल होत ट्रॅक्टर बाहेर काढला. त्यानंतर सात महिला मजूरांचे मृतदेह विहीरीतून बाहेर काढण्यात आले. दुपारच्या सुमारास चार मृतदेहावर वसमतच्या उपजिल्हा रुग्णालयात तर दोन मृतदेहावर नांदेड जिल्हयातील निळा तर एका मृतदेहावर नांदेड जिल्हयातील लिंबगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणी करण्यात आली. दरम्यान, रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास पाच मृतदेह अंत्यसंस्कारासाठी गुंज येथे आणण्यात आले होते. मात्र यावेळी मयत महिलांच्या नातेवाईकांनी शासनाकडून आर्थिक मदत, मयताच्या कुटुंबियातील एकास शासकिय नोकरी, गायरान जमिनीवरील घरे नावांवर करून देण्यासह इतर मागण्या मांडल्या. यावेळी पोलिस उपाधीक्षक राजकुमार केंद्रे, तहसीलदार शारदा दळवी, वसमत ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन बोराटे यांच्या पथकाने गुंज येथे धाव घेऊन मयत महिला मजुरांच्या कुटुंबीयांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचे नातेवाईक त्यांच्या मागण्यांवर ठाम होते. त्यामुळे तब्बल तीन तासांपेक्षा अधिक काळ चर्चा लांबली होती. त्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान, वसतमच्या तहसीलदार शारदा दळवी यांनी मयत महिला मजुरांचे कुटुंबीय व नातेवाईक यांच्याशी संवाद साधला. सर्व परिस्थिती समजावून सांगत त्यांच्या मागण्या शासनस्तरावर कळवण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर रात्री आकरा वाजण्याच्या सुमारास पाच मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. या शिवाय एका महिलेवर देळुब येथे अंत्यसंस्कार झाले. एका महिलेचे नातेवाईक रात्री उशीरापर्यंत आले नसल्याने त्यांचा मृतदेह वसमत उपजिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले. हे ही वाचा... ट्रॅक्टर विहिरीत कोसळून 8 महिलांचा मृत्यू:नांदेडच्या आलेगाव शिवारातली थरकाप उडवणारी घटना; मृतातील सर्व वसमत तालुक्यातील गुंजचे नांदेडमध्ये महिला मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळला आहे. या घटनेत आठ महिलांचा मृत्यू झाला आहे. नांदेडच्या आलेगाव शिवारात हा अपघात आज सकाळी 7 हा प्रकार घडला. या महिला हळद काढणीच्या कामासाठी जात होत्या. पूर्ण बातमी वाचा...
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/S61ek2w
आलेगाव शिवारातील ट्रॅक्टर अपघात:तहसीलदारांच्या आश्वासनानंतर 5 मृतदेहांवर रात्री अंत्यसंस्कार, तीन तासांपेक्षा अधिकवेळ मृतदेह एकाच ठिकाणी
April 04, 2025
0