दिल्ली ते शिर्डी विमान प्रवासादरम्यान दारूच्या नशेत असलेल्या एका प्रवाशाने एअर होस्टेसचा विनयभंग केला. शिर्डी विमानतळावर विमान लँड झाल्यानंतर ही घटना समोर आली. शिर्डी विमानतळ इंटरग्लोब एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड इंडिगो कंपनीच्या कर्मचाऱ्याने याबाबत राहाता पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार संबंधित प्रवाशाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, हा आरोपी लष्करात जवान असून अहिल्यानगर येथे कार्यरत असल्याचे समजते. संदीप सुमेरसिंग (रा. गालड, चुरू, राजस्थान) असे या आरोपीचे नाव आहे. शुक्रवारी (२ मे) दुपारी १.४० ते ४.१० मिनिटादरम्यान दिल्ली ते शिर्डी विमान (फ्लाइट नंबर ६ ई ६४०३) प्रवासादरम्यान आरोपीने एअरहोस्टेससोबत गैरवर्तन केेले. या घटनेतील पीडित एअर होस्टेस ही केरळमधील कोचीन येथील रहिवासी आहे. याबाबत शिर्डी विमानतळ इंटरग्लोब एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड इंडिगो कंपनीचा कर्मचारी संतोष कोंडीबा चौरे (४६, रा. लोणी) याने राहाता पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यात म्हटले आहे, की २ मे रोजी दुपारी १.४० ते ४.१० वाजेदरम्यान इंडिगो कंपनीचे विमान दिल्लीहून शिर्डीकडे येत होते. त्यावेळी आरोपीने एअरहोस्टेससोबत गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला. दरम्यान, पोलिस आता विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची चौकशी करू शकतात. याआधी देखील आरोपीने असे कृत्य केले का? याचाही चौकशी होणार आहे. राहता पोलिसांकडे तपास एअर होस्टेसने सांगितल्यानुसार, या विमानातील दारूच्या नशेत असलेला प्रवासी संदीप सुमेर सिंग याने पीडित एअर होस्टेससोबत गैरवर्तन करत होता. याबाबत इंटर ग्लोब एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड इंडिगोचा विटनेस फॉर्म लेखी स्वरूपात भरून दिला आहे. त्यावरून आरोपी संदीप सुमेरसिंग याच्याविरुद्ध राहाता पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक नितीन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अंमलदार सहायक फौजदार एन. यू. पेटारे करीत आहेत.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/vZRrKE4
दिल्ली ते शिर्डी विमानात एअर होस्टेसचा विनयभंग:मूळ राजस्थानच्या प्रवाशांविरोधात गुन्हा दाखल
May 05, 2025
0