Type Here to Get Search Results !

पुण्यात पतीसह 6 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल:चांदीची भांडी न दिल्याने सुनेला मारण्याचा प्रयत्न

लग्नात चांदीची भांडी दिली नाही, असे सांगत सासरच्या व्यक्तींनी हुंड्यासाठी विवाहितेचा गळा दाबून खुनाचा प्रयत्न केल्याची घटना वडगाव शेरी परिसरात घडली. या प्रकरणी पती, सासू, सासऱ्यांसह एकूण ६ आरोपीविरुद्ध चंदननगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी एका २४ वर्षीय तरुणीने आरोपीविरोधात चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. तिने दिलेल्या तक्रारीनुसार, पती प्रणील निकुडे (३२), सासरे उदय ( ६०), सासू वैशाली (५५), दीर प्रतीक (३०, सर्व रा. वडगाव शेरी), चुलत दीर प्रमोद, चुलत सासरे माणिक (रा. कल्याणीनगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदार २४ वर्षीय तरुणीचा आरोपी प्रणील निकुडे याच्याशी ऑक्टोबर २०२३ मध्ये थाटामाटात विवाह झाला होता. विवाहानंतर हुंड्यात चांदीच्या काही वस्तू दिल्या नाही. आई-वडिलांकडून पैसे घेऊन ये, असे पती प्रणीलने तिला वेळोवेळी सांगितले. त्यानंतर पती प्रणील, सासरे, उदय, सासू वैशाली, दीर प्रतीक, प्रमोद, चुलत सासरे माणिक यांनी तिला सतत टोमणे मारून शारीरिक आणि मानसिक छळ सुरू केला. दरम्यान, पुणे आणि परिसरात गेल्या काही महिन्यांपासून महिलांच्या छळाच्या घटनांत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने यासाठी काहीतरी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी सामाजिक संघटनांनी केली आहे. पतीने बेदम मारहाण करून गळा दाबला २५ जून रोजी तरुणीला पती प्रणीलने बेदम मारहाण करत तिचा गळा दाबला तसेच तिचा मोबाइलदेखील फोडला. तरुणीला फरफटत घरच्या गॅलरीत नेऊन तिला तेथून ढकलून देण्याचा प्रयत्न केला. पोलिसांकडून तक्रार दिल्यास जिवे मारू, अशी धमकी सासरे उदय यांनी दिली. गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक स्वाती खेडकर पुढील तपास करत आहेत. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर पुणे शहर परिसरात विवाहितांचा छळ केल्याच्या तक्रारी दाखल होण्याचे प्रमाण वाढले आहे. कात्रजमधील आंबेगाव परिसरात पतीच्या छळामुळे एका महिलेने सहा वर्षांच्या मुलासह पाचव्या मजल्यावरून उडी मारल्याची घटना नुकतीच घडलेली होती.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/MiWVHeO

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.