हिंगोली जिल्ह्यातील महसूल विभागातील 13 अधिकारी व कर्मचाऱ्यांची उत्कृष्ट काम केल्याबद्दल पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असून महसूल दिनी शुक्रवारी ता १ त्यांचा सत्कार केला जाणार आहे. महसूल विभागाच्या वतीने दरवर्षी तारीख एक ऑगस्ट रोजी महसूल दिन साजरा केला जातो. महसूल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मागील वर्षभरात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची पुरस्कारासाठी निवड केली जाते. यामध्ये अप्पर जिल्हाधिकारी ते गाव पातळीवरील पोलीस पाटील यांचा यामध्ये समावेश असतो. वर्षभरात केलेल्या कामगिरीचे मूल्यमापन करून पुरस्कारासाठी निवड केली जाते. त्यानुसार यावर्षी महसूल विभागात उत्कृष्ट काम केल्याबद्दल तेरा अधिकारी व कर्मचाऱ्यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. यामध्ये तत्कालीन अप्पर जिल्हाधिकारी खुशाल सिंह परदेशी वसमत चे उपविभागीय अधिकारी विकास माने, हिंगोली चे तहसीलदार श्रीकांत भुजबळ हिंगोली तहसीलदार सिद्धार्थ कोकरे, जिल्हाधिकारी कार्यालयातील लघुलेखक रंजना कोठाळे, तहसील कार्यालय कळमनुरी येथील सहाय्यक महसूल अधिकारी शारदा गारोळे, वारंगा फाटा येथील मंडळ अधिकारी आनंद काकडे, जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल सहाय्यक बालाजी निर्मले, वसमत तालुक्यातील ग्राम महसूल अधिकारी अमोल इंगळे, औंढा तहसील कार्यालयातील वाहन चालक भगवान कदम, जिल्हाधिकारी कार्यालयातील शिपाई अंबादास यादव, वसमत तहसील कार्यालयातील महसूल सेवक नागनाथ गिरी तर सांडस येथील पोलीस पाटील मुकुंदराव होडबे यांचा समावेश आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी ता एक महसूल दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार केला जाणार आहे. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी कांबळे, उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड यांच्यासह अधिकारी उपस्थित राहणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/6KIbG0m
हिंगोलील महसूल विभागातील पुरस्कारासाठी 13 अधिकारी कर्मचाऱ्यांची निवड:महसूल दिनी होणार सत्कार, वर्षभरात केलेल्या कामगिरीचे मूल्यमापन
July 31, 2025
0