Type Here to Get Search Results !

15 रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक बिघडले; संभाजीनगरात तपोवनचे प्रवासी खोळंबले:देवगिरीचा पेंटाग्राफ नाशिकजवळ ओव्हरहेड वायरला घासल्याने बिघाड

नाशिकजवळ लहवित ते अस्वली स्थानकादरम्यान शनिवारी (दि.१९) रात्री साडेनऊच्या सुमारास ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड तसेच देवळाली कॅम्प ते नाशिकरोड रेल्वे स्थानकादरम्यान देवगिरी एक्स्प्रेसचा पेंटाग्राफ ओव्हरहेड वायरला घासल्याने रविवारी मध्यरात्री दीड वाजेदरम्यान वायर तुटली. त्यामुळे रेल्वे वाहतूक ९ तास विस्कळीत झाली. सकाळी १० वा. ती सुरळीत झाली. या दरम्यान २ मेमू रद्द, ७ एक्स्प्रेसचा मार्ग बदलला, १५ एक्सप्रेस १ ते १० तासांपर्यंत विलंबाने धावत होत्या. पंचवटी एक्स्प्रेस ४० मिनिटे उशिरा धावली. तर मुंबईहून नांदेडमार्गे धावणारी तपोवन एक्सप्रेस छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावर साडेतीन तास उशिराने पोहोचली. खासगी भाड्यात ५० ते १०० रुपये वाढ नाशिकरोडला रोज ३० ते ३५ हजार प्रवासी असतात. कारने ८०० तर बसने ३०० पासून ९०० रुपयांपर्यंत तिकिट होते. कार व खासगी बसभाड्यात प्रति प्रवासी नाममात्र ५० ते १०० रुपये वाढ झाली होती. ग्राउंड झीरो - ६५ कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची ९ तास धावपळ दुरुस्तीसाठी ३ टॉवर वॅगन, ६५ कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची ९ तास धावपळ सुरु होती. दुरुस्तीनंतर वंदे भारत रेकची तपासणी करून ती धावण्यायोग्य असल्याचे निश्चित केले. तत्पूर्वी आवश्यक साधने, ग्राइंडिंग टूल्स व मनमाडहून पूरक साहित्य घटनास्थळी पाठवण्यात आले. मुंबईहून पहिल्या दोन गाड्यांना इगतपुरीपासून एस्कॉर्टिंगची व्यवस्था केली. नाशिक- मनमाड दरम्यान सायक्लिक एस्कॉर्टिंग करून रेक सुरक्षेवर भर देण्यात आला. नाशिक रोड व मनमाडला विशेष पीआरएस परताव्याची काउंटर सुरू विविध ठिकाणी घोषणांद्वारे व एसएमएसद्वारे प्रवाशांना माहिती. नाशिक व मनमाड येथे अतिरिक्त तिकीट तपासणी कर्मचारी नियुक्त.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/o8kMrbJ

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.