परतवाडा नजिकच्या देवगाव येथे चंद्रभागा नदीच्या पात्रात शेजारच्या पिंपळखुटा गावातील इसमाचा मृतदेह आढळून आला. या प्रकारामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले असून पंचक्रोशीत खळबळ माजली आहे. अचलपूर तहसील अंतर्गत येणाऱ्या आदर्श ग्राम देवगांवच्या मागील परिसरातून चंद्रभागा नदी वाहते. या परिसरातूनच हनवतखेडा आणि दत्तझिरीकडे जाणारा मार्ग आहे. दरम्यान शुक्रवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास गावातील काही लोकांना एक इसम मृत अवस्थेत पडलेला दिसून आला. त्यांनी ही माहिती तत्काळ पोलिसांना दिली. नदीपात्रानजीक मृतावस्थेत पडलेला या इसमाची ओळख संजीव बाबु अखंडे (४८) पिंपळखुटा अशी पटली आहे. मृतक संजीवबाबू हा विवाहित असून त्याला तीन मुले आहेत. मृतावस्थेत आढळुन आलेल्या अखंडे यांचा मृत्यु कशाने झाला, याबाबत परिसरातील नागरीक विविध चर्चा करत असले तरी पोलिस तपासानंतरच खरी बाब समोर येणार आहे.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/S2Qb9kF
चंद्रभागा नदीत सापडला मृतदेह:पिंपळखुटा येथील 48 वर्षीय विवाहित व्यक्तीचा मृत्यू रहस्यमय
July 19, 2025
0