भारतीय कॉर्फबॉल महासंघ व तामिळनाडू कॉर्फबॉल संघटनेच्या वतीने तांबरंम (चेन्नई) येथे २४ ते २७ जुलैदरम्यान २१ व्या बालगट व ३० व्या कनिष्ठ गटांच्या राष्ट्रीय कॉर्फबॉल अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी छत्रपती संभाजीनगरच्या तीन खेळाडूंची राज्य संघात निवड झाली आहे. पुण्यात झालेल्या संघ निवड चाचणी व शिबिरात उत्कृष्ट कामगिरी करत शुभरा कुंटे, आरव भंडारी व गौरव तत्तापुरे यांनी राज्य संघात स्थान मिळवले. तसेच, संघाच्या सहायक प्रशिक्षकपदी प्रशिक्षक विपुल कड यांची नियुक्ती केली. महाराष्ट्राचा संघ २२ जुलै रोजी पुण्यातून चेन्नईला रवाना होईल. या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक गणेश कड यांचे मार्गदर्शन लाभले.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/feh9QD5
कॉर्फबॉल:शुभरा, आरव, गौरवची राज्य संघात निवड
July 20, 2025
0