Type Here to Get Search Results !

वैद्यकीय सेवा:‘समृद्धी’वरील अपघात शून्यावर आणण्यास उपाययोजना करू- भुसे, 17 प्रकारच्या नियमभंगावर नियंत्रण ठेवणार

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी आयटीएमएस प्रणालीच्या माध्यमातून महामार्गावरील वेगमर्यादा,लेन शिस्त आणि इतर १७ प्रकारच्या नियमभंगावर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. याबरोबरच या महामार्गावरील अपघातांचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जातील, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली. विधानसभा सदस्य काशीनाथ दाते यांनी समृद्धी महामार्गावर होणारे अपघात यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली. या लक्षवेधीच्या चर्चेत सदस्य विठ्ठल लंघे यांनीही सहभाग घेतला. या लक्षवेधीच्या उत्तरात मंत्री भुसे यांनी सांगितले, समृद्धी महामार्गावर अपघात झाल्यास अपघातग्रस्तांना तत्काळ मदत व्हावी यासाठी महामार्गावर अत्याधुनिक शीघ्र प्रतिसाद २१ वाहने (या वाहनामध्ये रेस्क्यू ऑपरेशन करण्यासाठी फायर फायटिंग, हायड्रॉलिक जॅक, कटरर्स, ऑक्सिजन सिलिंडर सिस्टिम इत्यादी प्रथमोपचार सुविधांची सोय करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये ३१ रुग्णवाहिका याव्यतिरिक्त आपत्कालीन वैद्यकीय सेवेची रुग्णवाहिका (१०८) अहिल्यानगर जिल्ह्यात ४०, अमरावती ३१, छत्रपती संभाजीनगर ३१, बुलडाणा २३, जालना १५, नागपूर ४०, नाशिक ४६, ठाणे ३९, वर्धा ११, वाशीम ११ अशा २८७ रुग्णवाहिका आपत्कालीन परिस्थितीमध्ये उपलब्ध असतात, असेही मंत्री भुसे यांनी सांगितले.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/MtIh59z

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.