अखिल विश्वाला मानवतेचा संदेश देणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, यांच्या महासमाधीस्थळी एक दिवसीय गुरुपौर्णिमा महोत्सवाला आज, गुरुवारी पहाटे ब्रह्ममहुर्तावर प्रारंभ झाला. तीर्थस्थापना व सामुदायिक ध्यानाने या कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. या कार्यक्रमानिमित्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची महासमाधी शेकडो दिवे आणि आकर्षक रंगीबेरंगी फुलांनी सजविण्यात आली होती. सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावर गुरुवारी हजारो गुरुदेवप्रेमींनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना गुरुस्थानी ठेऊन आदरांजली अर्पण केली. या दिमाखदार सोहळ्यादरम्यान ब्रह्ममुहुर्तावर पहाटे चार वाजता राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या महासमाधीचा अभिषेक करण्यात आला. गुरुदेवप्रेमींनी गुरूमाऊलीला आदरांजली वाहताना, गुरु नामकी नैय्या हमे भव दुखसे तरवायेगी! गुरुकृपा नही पडी सडकपर मेरा मै जाणू।बीज न बोये जाते सडकपर मेरा मै जानू।। अशी एकापेक्षा एक सुमधुर सुहाय्य वंदनाने राष्ट्रसंतांची भजने सादर केली. शंखाचा ध्वनी नीनाद व राळ उदाच्या धुपाने वातावरणात वेगळेच चैतन्य निर्माण झाले होते. सामुदायिक ध्यानाच्या कार्यक्रमानंतर आश्रमाच्या महाद्वारावर नवी कोरी भगवी पताका अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवामण्डळाच्यावतीने फडकवण्यात आली. भाविकांना गुरुत्वताशी जोडण्यासाठी तसेच गुरूंना साक्षी ठेऊन सामाजिक धार्मिक व राष्ट्रीय हितासाठी प्रेरणा मिळावी या उद्देशाने अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने दरवर्षी गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन गुरुकुंजात केले जाते. अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवामंडळाचे सर्वाधिकारी लक्ष्मण गमे, यांच्या हस्ते पूजन करून सामुदायिक ध्यानाने गुरुपौर्णिमा उत्सव सुरु झाला. यावेळी प्रचारप्रमुख प्रकाश वाघ यांनी सामुदायिक ध्यानावर चिंतन व्यक्त केले. दुपारी बारा वाजता ज्ञानेश्वरी दीदी यांची गुरुमहिमा या विषयावर प्रवचन करण्यात आले. गुरुकुंजात दिवसभर सुरू असलेल्या कार्यक्रमात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, लिखित गुरुकृपा नही पडी सडक पर, यासह विविध लोकप्रिय खंजरी भजने सादर करण्यात आली. गुरुपौर्णिमा महोत्सवानिमित्त भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. गुरुपौर्णिमा महोत्सवाची सांगता सामुदायिक प्रार्थनेने करण्यात आली असून याकरीता अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवामण्डळ व गुरुपौर्णिमा महोत्सव आयोजन समिती प्रमुख यांनी अथक परिश्रम घेतले.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/7xmU6je
तिवसा येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या स्मृतींना उजाळा:गुरुपौर्णिमा महोत्सवात हजारो भाविकांची गर्दी, महासमाधीस्थळी भजन-पूजन
July 10, 2025
0