Type Here to Get Search Results !

पुण्यात बुधवार पेठेत पोलिसांचा छापा:भारतात अवैधरित्या वास्तव्यास असलेल्या 5 बांगलादेशी महिलांना अटक

पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी अवैधरीत्या बांगलादेशी महिला पुरुष यांचा शोध घेवून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते. त्याअनुषंगाने फरासखाना पोलिस स्टेशन येथील प्रभारी अधिकारी प्रशांत भस्मे, यांच्या गोपनीय बातमीच्या अनुषंगाने तपास पथक तसेच ए.टी. सी. पथकातील अधिकारी व अंमलदार यांना फराखाना पोलिस स्टेशन हद्दीमधील बुधवार पेठ पुणे येथील रेड लाईट एरिया मधील मालाबाईचा वाडा, बुधवार पेठ येथे अवैधरीत्या बांगलादेशी महिला ,पुरुष असल्याबाबत माहिती प्राप्त झाली होती. त्याअनुषंगाने सदर भागात शोध घेवुन कायदेशीर कारवाई करण्याचे अनुषंगाने दोन पथके तयार करून, मालाबाईचा वाडा, बुधवारपेठ पुणे येथील रेड लाईट एरीया मध्ये अचानक छापा टाकला गेला. त्यामध्ये ५ बांगलादेशी महिला मिळून आल्या आहे. संबंधित महिलांना ताब्यात घेवून त्यांची पोलिसांकडून कसून चौकशी केली असता, त्या अवैधरीत्या विनापरवाना भारतात येवुन, स्वखुशीने वेश्याव्यवसाय करुन, त्यांची उपजीविका भागवत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यांना ताब्यात घेवुन त्या बांगलादेशी असल्याचे पुरावे जमा करुन, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे. अटक महिला आरोपींची नावे जहानारा मजिद शेख (वय-४५ वर्षे रा. मालाबाई वाडा बुधवार पेठ, पुणे मो, मूळगाव लक्ष्मणपुर वार्ड-३, शारशा, जैशोर, खुलना, बांगलादेश) शिल्पी बेगम रबिउल्ला शेख (वय-२८ वर्षे, रा. मालाबाई वाडा बुधवार पेठ पुणे. मूळगाव बेरा राघुंगा घर, पोस्ट तेघरिया १३११, केरानीगंज, ढाका, बांगलादेश) नुसरात जहान निपा (वय- २८ वर्षे, रा. मालाबाई वाला बुधवार पेठ पुणे, मूळगाव ग्राम मैजपारा, पाँच रुखी, पोस्ट पाँच रुखी बाजार, थाना- अराईहजार, जिल्हा नारायाणगंज, बांगलादेश) आशा खानाम इयर अली (वय ३० वर्षे ,रा. सध्या रंगा शेठ चौक, सतवाल मंदीर कात्रज पुणे, मूळगाव ग्राम परुल बाजार जिल्हा नोडाई थाना कालिया, बांगलादेश) शिल्पी खालेकमिया अक्तर (वय २८ वर्षे ,रा. मालाबाई वाडा बुधवारपेठ पुणे, मुळगाव - ग्राम मुलीकपूर, पोस्ट रायपुरा, थाना रायपुरा, जिल्हा नरसिंगदी, बांगलादेश) सदरच्या महिला बांगलादेश येथून, छुप्या पद्धतीने बॉर्डर पार करुन अवैधरीत्या भारतात येत होत्या, त्यानंतर त्या पश्चिम बंगाल येथील रहिवाशी असल्याचे सांगून, पुणे येथे रेड लाईट एरियामध्ये स्वखुशीने वेश्या व्यवसाय करीत असल्याचे चौकशी दरम्यान निदर्शनास आलेले आहे.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/dZ8PyVc

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.