पत्नी आणि तिचा मित्र वेगवेगळ्या कारणांवरून सतत त्रास देत असल्याने तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नाना पेठेत घडली. तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याने पत्नीसह तिच्या मित्राविरुद्ध समर्थ पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. अतुल मारुती कदम (३९, रा. बालाजी काॅम्प्लेक्स, पिंपरी चौक, नाना पेठ, पुणे) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. अतुल कदम यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून पत्नी सोनाली अतुल कदम (३१, रा. साडेसतरानळी, हडपसर, पुणे) तसेच तिचा मित्र कृष्णा शिंदे (रा. हडपसर, पुणे) यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत अतुल याची आई माधुरी मारुती कदम (६१) यांनी समर्थ पोलिस ठाण्यात आराेपीविराेधात फिर्याद दिली. अतुल आणि सोनाली यांचा सन २०१५ मध्ये विवाह झाला होता. विवाहानंतर त्यांच्यात काैटुंबिक कारणावरून सातत्याने वाद सुरू हाेते. अतुलला पत्नी साेनाली हिचे कृष्णा शिंदे याच्याशी जवळचे मैत्रीसंबंध असल्याचे समजल्याने त्यांच्यातील वाद विकाेपाला गेले हाेते. पत्नीही माहेरी गेली राहायला वादामुळे सोनालीदेखील वेगळी राहायला माहेरी निघून गेली हाेती. परंतु त्यानंतर सोनाली आणि तिचा मित्र कृष्णा यांनी अतुलला त्रास देण्यास सुरुवात केली. त्याच्या मोबाइलवर फाेन करून त्यास सतत धमकावण्यात येत हाेते. पत्नी आणि तिच्या मित्राच्या त्रासामुळे अतुल यांनी मागील महिन्यात १५ जून रोजी राहत्या घरी गळफास घेतला. पत्नी आणि तिच्या मित्राने दिलेल्या त्रासामुळे मुलगा अतुलने आत्महत्या केल्याचे आई माधुरी यांनी दिलेल्या फिर्यादीत सांगितल्याने गुन्हा दाखल केला आहे.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/gCIJjst
पुण्याच्या नाना पेठची घटना, आरोपींवर गुन्हा दाखल:पत्नीसह तिच्या मित्राचा त्रास, पतीची आत्महत्या
July 10, 2025
0