Type Here to Get Search Results !

कोल्हापुरातील जिल्हा न्यायालयात सुरक्षेचा फज्जा:पिस्तूल घेऊन तिसऱ्या मजल्यापर्यंत पोहोचला व्यक्ती, गुन्हा दाखल

कोल्हापूर येथील जिल्हा न्यायालयासारख्या उच्च सुरक्षा परिसरात सोमवारी (१४ जुलै) एक धक्कादायक प्रकार घडला. एक व्यक्ती पिस्तूल घेऊन थेट जिल्हा सत्र न्यायालयाच्या तिसऱ्या मजल्यापर्यंत पोहोचला. वेळेवर पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. याप्रकरणी सदर व्यक्तीला अटक करून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेश संभाजी नरके असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून, तो हातकणंगले तालुक्यातील वाठार तर्फ वडगाव येथील रहिवासी आहे. सुरेश नरके हा सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास कोर्टात पोहोचला. त्याचे वारंवार कमरेला हात लावणे कोर्ट परिसरात ड्युटीवर असणाऱ्या पोलिस कॉन्स्टेबल संजय पारळे यांच्या लक्षात आले. संशयित हालचालीमुळे त्यांनी नरकेला बाजूला नेऊन चौकशी केली असता, त्याच्याकडे अंदाजे दीड लाख रुपये किमतीचे परवाना असलेले पिस्तूल सापडले. 2017 साली सुरू झालेल्या जमिनीच्या वादातील प्रकरणाच्या सुनावणीसाठी नरके कोर्टात आला होता. ही सुनावणी न्यायाधीश एस.एस. तांबे यांच्यासमोर होणार होती. पोलिसांत गुन्हा दाखल घटनेची माहिती मिळताच शाहूपुरी पोलिस ठाण्याचे पीएसआय अनिकेत कुंडले घटनास्थळी पोहोचले आणि नरकेला ताब्यात घेतले. न्यायालय परिसरात शस्त्र घेऊन जाण्यावर बंदी असतानाही तो पिस्तूल घेऊन आला होता. त्यामुळे त्याच्याविरुद्ध शस्त्रबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. व्यक्तीचा पिस्तुल परवाना होणार रद्द पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश नरकेला 2022 साली पिस्तूल परवाना मिळाला होता. त्याचा पिस्तुल परवाना डिसेंबर 2028 पर्यंत वैध आहे. मात्र, आजच्या न्यायालयातील प्रकारानंतर त्याचा परवाना रद्द करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे शिफारस केली जाणार आहे. कोर्टातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह न्यायालय परिसरात सामान्य माणूस पिस्तूल घेऊन पोहोचतो, ही बाब अत्यंत गंभीर मानली जात आहे. या घटनेमुळे कोल्हापूर न्यायालयातील सुरक्षा व्यवस्थेच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले. मेटल डिटेक्टर यंत्रणा कार्यरत होती का? तपासणी का झाली नाही? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/93A8ey6

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.