फॅशन शोमध्ये दाखवलेली पादत्राणे ही कोल्हापुरी चप्पलच असल्याचे मान्य करत कोल्हापुरातील चप्पल व्यावसायिकांना जगभरातील बाजारपेठेचा फायदा मिळवून देण्याबाबतचे आश्वासन दिले. प्राडाने आज सहा सदस्ययीय शिष्ठमंडळ पाठवून कोल्हापुरातील चप्पल कारखान्यांना भेट दिली. त्यानंतर टीमने कंदलगाव येथील चप्पल कारखाना, कागल येथील महिला कारागिर चप्पल क्लस्टर केंद्राला भेट देऊन तेथील कामाची माहिती घेतली.पुढील महिन्यामध्ये प्राडाचे बिझनेस हेड मुंबईला भेट देणार आहेत. त्यावेळी त्यांची कोल्हापुरातील चप्पल व्यावसायिकांशी भेट घडवून दिली जाईल, अशी माहिती महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांनी या वेळी दिली. शिष्टमंडळामध्ये कंपनीच्या उत्पादन विभागाचे संचालक पाओलो टिव्हरॉन, डॅनिएल कोंटू, आंद्रिया पोलास्ट्रेली यांचा समावेश होता. फॅशन शोमध्ये कोल्हापुरीच होती प्राडाच्या शिष्टमंडळाने जवाहरनगर, सुभाषनगर येथील अरुण सातपुते, बाळू गवळी, सुनील कोळेकर, दीपक खांडेकर, शिवाजी माने, सुनील लोकरे यांच्या चप्पल कारखान्यांना भेट देऊन, उत्पादन, बांधणी, विक्रीची पद्धत याची माहिती करून घेतली. फॅशन शोमध्ये दाखवलेली पादत्राणे ही कोल्हापुरी चप्पलच असल्याचे त्यांनी मान्य करत कोल्हापुरातील चप्पल व्यावसायिकांना जागतिक बाजाराचा फायदा मिळवून देण्याबाबत आश्वस्त केले.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/QMaOWk1
कोल्हापूर येथील भेटीदरम्यान प्राडाच्या शिष्टमंडळाचे आश्वासन:कोल्हापुरी चप्पल व्यावसायिकांना जागतिक बाजाराचा फायदा देऊ
July 15, 2025
0