मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल टेस्ला कारच्या शोरूमच्या उद्घाटनावेळी कंपनीच्या कारची टेस्ट ड्राईव्ह केली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळात या कारची पाहणी करत टेस्ट ड्राईव्ह घेतली. यावरून आदित्य ठाकरे यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. आज तुम्ही केले तर आम्ही पण करणार यातून ते घडले, असा टोला आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंना लगावला. तसेच टेस्ला कंपनी तीन वर्षांपूर्वीच महाराष्ट्रात येणार होती, असा दावा करत केंद्र सरकारने अडथळा टाकल्यामुळेच ती संधी हुकली, असा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केला. टेस्ला कंपनीच्या भारतातील पहिल्या शोरूमचे उद्घाटन मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. मेकर मॅक्सिटी कमर्शियल कॉम्प्लेक्समध्ये उभारलेल्या या एक्सपीरियन्स सेंटरमुळे भारतात टेस्लाच्या विक्रीला सुरूवात झाली. यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानभवनात टेस्ला गाडीची पाहणी केली आणि स्वतः ती चालवण्याचाही अनुभव घेतला. यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि टेस्लाचे काही अधिकारीही उपस्थित होते. आता याच गोष्टीवरून आदित्य ठाकरे यांनी निशाणा साधला आहे. टेस्ट ड्राईव्हवरून एकनाथ शिंदेंना टोला काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी टेस्लाचे उद्घाटन केले तेव्हा आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना गाडी आणण्याची गरज नव्हती. तुम्ही केले तर आम्ही पण करणार यातून ते घडले, असे आदित्य ठाकरे म्हणाले. टेस्ला तीन वर्षांपूर्वीच महाराष्ट्रात आली असती तसेच आदित्य ठाकरे यांनी दावा केला की, ही टेस्ला कंपनी 2022 साली महाराष्ट्रात आली असती. तेव्हा मी सुद्धा टेस्ट ड्राईव्ह केली होती. तेव्हा केंद्र सरकारने अडचणी निर्माण केल्या नसत्या टेस्ला महाराष्ट्रात आली असती. आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, 25 लाख रुपयांना मिळणारी टेस्ला आता 60 लाख रुपयांना मिळत आहे. याला जबाबदार कोण? याचाही विचार करणे गरजेचे आहे. एकाच कार कंपनीच्या मागे जाण्यापेक्षा इलेक्ट्रिक कार कंम्पोनट आहेत त्याच्या मागे जायला हवे. हे ही वाचा... उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली टेस्ला कारची टेस्ट ड्राइव्ह:गाडी थेट विधानभवन परिसरात, मंत्री प्रताप सारनाईक म्हणाले- मी खरेदी करणार देशात प्रथमच टेस्ला कार 15 जुलै रोजी दिमाखात दाखल झाली. त्यानंतर 16 जुलै रोजी ही देशातील पहिली टेस्ला कार थेट महाराष्ट्राच्या विधानभवनात दाखल झाली. काल पार पडलेल्या उद्घाटन सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक उपस्थित होते. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या सोहळ्याला गैरहजर होते. त्यामुळे प्रताप सरनाईक यांनी स्वतः ही कार विधानभवनात नेली. पूर्ण बातमी वाचा...
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/NkBIxWT
टेस्ला तीन वर्षांपूर्वीच महाराष्ट्रात आली असती:पण केंद्र सरकारने अडचणी निर्माण केल्या - आदित्य ठाकरे; टेस्ट ड्राईव्हवरून शिंदेंनाही लगावला टोला
July 16, 2025
0