अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी दोन जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 18 रोजी अकरा वाजण्याच्या सुमारास सातारा शहर परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी सुरेश परशुराम शिंगाडे आणि विशाल सुरेश शिंगाडे दोन्ही रा. पुसेगाव, ता. खटाव, जि. सातारा यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राठोड करीत आहेत. गळफास घेऊन एकाची आत्महत्या गळफास घेऊन एकाने आत्महत्या केल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 20 रोजी सात ते नऊ वाजण्याच्या दरम्यान सुनील शंकरराव प्रभूदेसाई रा. गोडोली, सातारा यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अधिक तपास महिला पोलीस नाईक बोराटे करीत आहेत. अपघातातील जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू अपघातातील जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 19 रोजी शुभम काशिनाथ शिंदे रा. दरे, ता. कोरेगाव, जि. सातारा या युवकाचा पारंगे चौकात अपघात झाला होता. त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार हिरवे करीत आहेत.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/eZgwI3K
सातारा क्राइम:अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा
July 21, 2025
0