आम्ही आहोत पुणे शहरात राहणारे माजी आमदार. आज आम्ही राजकारणात सक्रिय आहोत असा आमचा दावा नाही, पण कधीतरी आम्ही आमदार होतो आणि महाराष्ट्राच्या विधानसभेत सदस्य म्हणून बसत होतो. आम्ही कोणत्या राजकीय पक्षातर्फे जनतेचे प्रतिनिधी म्हणून विधानसभेत बसत होतो ही बाब गौण आहे. आमच्या काळात विधानसभेचे सभागृह राज्यातील सर्वोच्च पवित्र असे मुक्त संवादाचे, प्रामाणिक मतभेद व्यक्त करण्याचे तीर्थस्थळ होते. हे सर्वोच्च सभागृह पूर्णपणे सुरक्षित होते. आता आमची इच्छाच मेली, अशी उद्विग्न भावना पुण्यातील माजी आमदारांनी व्यक्त केली. महाराष्ट्र विधिमंडळात गुंड व गुन्हेगारांच्या हैदोसाविरोधात पुणेस्थित ज्येष्ठ माजी आमदारांची युवक क्रांती दलाच्या वतीने संयुक्त पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. या प्रसंगी डॉ. कुमार सप्तर्षी, ॲड. वंदना चव्हाण, ॲड. जयदेवराव गायकवाड, बाळासाहेब शिवरकर, ॲड. एल. टी. सावंत, संयोजक राहुल डंबाळे आदी मान्यवर उपस्थित होते. रामदास फुटाणे म्हणाले, आधी राजकारणाचे गुन्हेगारीकरण करण्यात आले. आता गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी सरकार ताब्यात घेतलेले दिसते. विरोधी पक्षांच्या मुसक्या बांधलेल्या, अशा अवस्थेत लोकशाहीच्या पवित्र मंदिराला उद्ध्वस्त करणाऱ्यांचा आम्ही एकमुखाने तीव्र निषेध करतो आणि तो जनतेच्या कोर्टात नोंदवत आहोत. सध्या लोकशाहीचे प्रतिनिधीशाहीत रूपांतर झाले आहे. दरम्यान, या वेळी डॉ. कुमार डॉ. सप्तर्षी म्हणाले, जनताभिमुख धोरणे अमलात आणून राज्याचा विकास करणे ही कामे अपेक्षित असते. संस्कृतीला कलंक : शिवरकर बाळासाहेब शिवरकर म्हणाले, सभागृहात महाराष्ट्राच्या संस्कृतीला कलंक लावण्याचे काम सुरू आहे. आमदारांच्या काही समस्या, तक्रार असतील तर त्या एका समितीमार्फत सोडवल्या जातात. आज सत्ताधारी आमदार कुणाला मारहाण करतात हे चित्र विदारक आहे. संवैधानिक सभागृहाने जनतेला दिशा देण्याचे काम करायचे असते याचा विसर राजकीय मंडळींना पडला आहे का, असेही शिवरकर म्हणाले. गृहमंत्री आहेत की नाही : चव्हाण ॲड. वंदना चव्हाण म्हणाल्या, राज्याला आज गृहमंत्री आहेत की नाही असा प्रश्न पडत आहे, असतील तर कारवाई का होत नाही हा गंभीर विषय आहे. राजकारण करणारे असे वागत असतील तर जनतेने काय करायचे? राज्यात शिक्षण, शेती, रोजगार हे गंभीर विषय आहेत. मात्र विधिमंडळामध्ये होत असलेल्या गोंधळात हे विषय मागे पडत चालले आहेत. परिणामी महाराष्ट्राची अधोगती होत असल्याचे दिसते.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/y6mw0T9
राजकारण:विधिमंडळात प्रवेशाची इच्छाच मेली!, पुण्याच्या माजी आमदारांनी व्यक्त केली उद्विग्न भावना
July 21, 2025
0