राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका बैठकीत संभाजी ब्रिगेड व बामसेफला संपवण्याचा कट रचण्यात आल्याचा दावा संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी सोमवारी केला. त्यांच्या या आरोपामुळे भाजप व संभाजी ब्रिगेडमधील वाद अधिकच चिघळण्याची शक्यता आहे. माझ्यावर हल्ला करणारा दीपक काटे हा भाजप युवा मोर्चाचा सरचिटणीस आहे. त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याचीच या हल्ल्यासाठी निवड करण्यात आली. हा हल्ला पूर्वनियोजित होता. त्या वेळी आम्ही बेसावध होतो. काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची एक बैठक झाली. या बैठकीत संभाजी ब्रिगेड व बामसेफ या संघटना संपवण्याचा कट रचला गेला, असेही ते म्हणाले. दरम्यान, राज्य सरकारने जनसुरक्षा कायदा आणला आहे. त्याच कायद्याचा आधार घेऊन फडणवीस सरकारने या कायद्याचा पहिला आरोपी दीपक काटे याला करावा, अशी मागणी मराठा समाजाच्या बैठकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केली. सरकार काय निर्णय घेतेय ते पाहून आम्ही भूमिका ठरवू, असे बैठकीनंतर समाजाचे प्रमुख नेते श्रीकांत शिरोळे यांनी सांगितले. मराठा समाजाची सोमवारी दुपारी पुण्यात बैठक पार पडली. शिवाजी व्यायाम मंडळात झालेल्या बैठकीला मराठा समाजातील प्रमुख पुरुषोत्तम खेडेकर, श्रीकांत शिरोळे यांच्यासह इतर पक्ष आणि संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. अक्कलकोटमध्ये काटेसह दोघांना केली अटक अक्कलकोट संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड व इतर कार्यकर्त्यांवर शाईफेक करून मारहाण केल्याप्रकरणी शिवधर्म फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक काटे, भवानेश्वर बबन शिरगिरे (रा. इंदापूर, जि. पुणे) यांना अटक करण्यात आली आहे. संबंधितांना चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली असून अक्कलकोट येथून घटनेनंतर पसार झालेल्या पाच आरोपींचा तपास सुरू असल्याचे चौकशी अधिकारी नीलेश बागाव यांनी सांगितले. छत्रपती संभाजी महाराज नावाने संस्था श्री छत्रपती संभाजी महाराज ब्रिगेड नावाने १० वर्षांपूर्वी कांबळे नावाच्या व्यक्तीने संस्था स्थापन केली आहे. त्यामुळे तांत्रिक अडचण आल्याने संभाजी ब्रिगेड हेच नाव कायम राहिले आहे. ही अडचण प्रवीण गायकवाड यांनी काटे याला सांगितलेली होती, पण त्यांनी शो केला. -श्रीकांत शिरोळे, (नेते, मराठा समाज) काटे भाजपचा असला तरी कारवाई बावनकुळे हल्लेखोर दीपक काटे हा भाजपचा पदाधिकारी असल्याचा आरोप होत आहे. पण पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मात्र गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा भाजपशी काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले. दीपक काटे हा भाजपचा कार्यकर्ता असला तरी त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. दीपक काटे हा इंदापूरचा रहिवासी असून भाजयुमोचा सचिव आहे. ६ जानेवारी रोजी पुणे विमानतळावर त्याला अटक करण्यात आली होती, असेही सांगण्यात येत आहे. प्रवीण गायकवाडांचा जीव घेण्याचाच प्रयत्न : वडेट्टीवार गायकवाड यांना गाडीतून बाहेर खेचून पाडण्यात आले. काळे फासण्यात आले. हा त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न होता, असा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांनी केला. यांच्यासाठी कायदा नाही का? गायकवाड हे निर्भीडपणे काम करत आणि त्यांच्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला आहे. त्यामुळे कठोर कारवाईची मागणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. राज्यात कायदा व सुव्यवस्था राहिली नसल्याचेही ते म्हणाले. संभाजी हे नाव आदरातिथ्याने घेतले गेले, ते एकेरी होऊ शकत नाही संभाजी हे नाव आदरातिथ्याने घेतले गेले आहे. जी हा प्रत्यय लागल्याने आदरातिथ्यानेच उल्लेख असतो. अनेक नेत्यांनाही नुसते नाव वापरून जी लावले जाते. त्यामुळे नाव एकेरी आहे म्हणण्यात काही अर्थ नाही. -श्रीमंत कोकाटे, (इतिहासकार, पुणे)
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/J7ByZLX
मराठा संघटनांची बैठक:संघाच्या बैठकीत संभाजी ब्रिगेडला संपवण्याचा कट- प्रवीण गायकवाड, गायकवाडांना काळे फासल्याचे पुण्यात पडसाद
July 14, 2025
0