कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. धरणातील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आज 21 ऑगस्ट रोजी रात्री 9.00 वाजता कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे उघडण्यात आले आहेत. हे दरवाजे ६ इंचावरून ३ फुटापर्यंत खाली आणलेत. याद्वारे १९,८०० क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात आला आहे. कोयना धरणाचे दरवाजे उघडण्यात आले असून त्यामुळे नदीपात्रातील पाणी पातळी वाढण्याची शक्यताही आहे. त्याकरिता प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. यात कराड, पाटण, चिपळूण तसेच कोयना नदीलगतच्या इतर गावांचा समावेश आहे. येथील नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. शेतकरी व नागरिकांनी नदीपात्राजवळ जाणे टाळावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने स्थानिक प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन पथके सतर्क करण्यात आले आहे. कोयना धरणाशी संबंधित ही बातमी पण वाचा... कोयना धरणातून 95,300 क्युसेक पाण्याचा विसर्ग:नदीपात्रात पूरस्थिती, एनडीआरएफकडून पुरात अडकलेल्या 11 माकडांचे रेस्क्यू सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्यामुळे जिल्ह्यातील प्रमुख धरणे भरली असून, पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस वाढल्याने धरणातील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे 13 फुटांपर्यंत उघडून 95,300 क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात आला आहे. दरम्यान कोयना धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू झाल्याने कोयना नदीला पूर आला आहे. यामुळे पाटण तालुक्यातील संगमनगर धक्क्याजवळ पुरात अडकलेल्या 11 माकडांना वाचवण्यासाठी कराडमधील एनडीआरएफच्या (NDRF) टीमने यशस्वी रेस्क्यू ऑपरेशन केले. दुपारपासून सुरू असलेले हे थरारक बचावकार्य रात्री उशिरा पूर्ण झाले. स्थानिक नागरिक आणि वन विभागाच्या मदतीने एनडीआरएफच्या जवानांनी अथक प्रयत्नांनंतर माकडांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवले. या बचाव कार्यामुळे परिसरात समाधान व्यक्त होत आहे. वाचा सविस्तर...
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/5X2qFpd
कोयना धरणातून 19,800 क्युसेक पाण्याचा विसर्ग:नदीकाठावरील नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
August 21, 2025
0