Type Here to Get Search Results !

कारमध्ये फिरवून केली बेदम मारहाण:पुण्यात पतीच्या अनैतिक संबंधास वैतागून पत्नीने भावाच्या मदतीने केले पतीच्या प्रेयसीचे अपहरण,

हिंजवडी आयटी पार्कमध्ये एक अनाेखी घटना घडली असून पतीच्या अनैतिक संबंधाला वैतागून पत्नीने तिचा भाऊ व आईच्या मदतीने पतीच्या प्रेयसीचे अपहरण केले. त्यानंतर तिला कारमध्ये दाेन ते अडीच तास फिरवत धमकी देत बेदम मारहाण केली. परंतु सदर तरुणीचे अपहरण झाल्याची माहिती पाेलिसांना मिळाली व त्यांनी महिलेचा शाेध सुरू केला. पाेलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने महिलेचा माग काढत तिची सुखरूप सुटका केली. याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात आराेपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित पीडित महिला ही विप्राे सर्कल येथे २० ऑगस्ट राेजी सायंकाळी साडेचार वाजता असताना तिला एका अनाेळखी व्यक्तीने फाेन केला. तुमचे पार्सल द्यायचे आहे, असे सांगत तिला त्याने आॅफिसच्या बाहेर बाेलावून घेतले. त्या ठिकाणी कारमध्ये तिला प्रियकराची पत्नी, तिचा भाऊ व आई यांनी जबरदस्तीने बसवत तिचे अपहरण केले. त्यानंतर तिला ताथवडे, वाकड अशा विविध ठिकाणी फिरवत तिला धमकी देऊन बेदम मारहाण करण्यात आली. कार शोधून काढली सदर महिला या प्रकाराने भयभीत झाली. ती बेपत्ता झाल्याची तक्रार पाेलिसांकडे आल्यावर हिंजवडी परिसरातील घटनास्थळ भागातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी पाेलिसांनी केली. त्यावेळी तिचे अपहरण करण्यात आल्याचे दिसून आले. कारच्या क्रमांकावरून पाेलिसांनी माग काढत तांत्रिक विश्लेषण आधारे कार नेमकी कुठे आहे हे शाेधून काढले. त्यानंतर महिलेची कारमधून सुखरुप सुटका करण्यात आली आहे. याप्रकरणी आराेपीवर गुन्हा दाखल करण्यात आला

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/LeVAdQg

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.