Type Here to Get Search Results !

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत करार:संभाजीनगरच्या ऑरिक सिटीत 4700 कोटींचा सोलर प्रकल्प; 2500 जणांना रोजगार मिळेल

राज्य सरकारकडून मंगळवारी (दि. १९ ऑगस्ट) आठ महत्त्वाचे सामंजस्य करारांसह (एमओयू) दोन धोरणात्मक करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. विशेष म्हणजे स्वच्छ ऊर्जा उत्पादन सक्षम करण्यासाठी व २५०० थेट रोजगार संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने संभाजीनगरच्या ऑरिक, एमआयटीएल येथे ४७०० कोटींच्या गुंतवणुकीसह ६ गिगावॅट क्षमतेचा सोलर सेल आणि मॉड्यूल उत्पादन प्रकल्प स्थापन केला जाणार आहे. मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत हे करार झाले. यावेळी मुख्य सचिव राजेशकुमार, उद्योग सचिव डॉ. पी. अन्बलगन आणि गुंतवणूकदार उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात गुंतवणुकीची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी शासनाची संपूर्ण टीम गुंतवणूकदारांसोबत काम करेल. यूकेसोबतही धोरणात्मक करारही करण्यात आला आहे. हायपरलूप प्रकल्प लॉजिस्टिक्स, वाहतूक आणि मोबिलिटी क्षेत्रात राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात आमूलाग्र बदल घडवेल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. कंपनी क्षेत्र गुंतवणूक रोजगार ज्युपिटर इंटरनॅशनल लि. सोलार पॅनल १०,९०० काेटी ८,३०८ रोचक सिस्टिम्स प्रा. लि. डेटा सेंटर २,५०८ काेटी १,००० रोव्हिसन टेक हब प्रा. लि. डेटा सेंटर २,५६४ काेटी १,१०० वॉव आयर्न अँड स्टिल पोलाद उद्योग ४,३०० काेटी १,५०० वेबमिंट डिजिटल प्रा. लि. डेटा सेंटर ४,८४६ काेटी २,०५० ॲटलास्ट कॉपको औद्योगिक उपकरणे ५७५ काेटी ३,४०० एलएनके ग्रीन एनर्जी हरित ऊर्जा ४,७०० काेटी २,५०० प्रेस्टिज इस्टेट प्रोजेक्ट डेटा सेंटर, लॉजि. १२,५०० काेटी ८,७००पी. अन्बलगन आणि गुंतवणूकदार उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात गुंतवणुकीची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी शासनाची संपूर्ण टीम गुंतवणूकदारांसोबत काम करेल. यूकेसोबतही धोरणात्मक करारही करण्यात आला आहे. हायपरलूप प्रकल्प लॉजिस्टिक्स, वाहतूक आणि मोबिलिटी क्षेत्रात राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात आमूलाग्र बदल घडवेल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/tNFCAug

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.