मातृत्व हा स्त्रीच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा आणि नाजूक काळ असतो. या काळात आई आणि बाळाचे आरोग्य सुरक्षित ठेवणे ही सर्वोच्च गरज असते. गर्भधारणेपासून प्रसूतीपर्यंत आणि त्यानंतरच्या काळात योग्य काळजी न घेणे या दोघांसाठीही जोखमीचे कारण ठरू शकते. या पार्श्वभूमीवर शासन पंतप्रधान सुरक्षित मातृत्व सारख्या योजना राबवण्यात येतात. मात्र, ग्रामीण रुग्णालयात अत्यावश्यक सुविधांचा अभाव आणि अनेकदा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे बाळ आणि बाळंतीणीला जीव गमवावा लागत असल्याच्या अनेक घटना आजही ग्रामीण भागात घडत असतात. अशीच एक घटना भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यात घडली आहे. प्रसूती पश्चात एका बाळाचा आणि मातेचा दुर्दैवी मृत्यू झाला. प्राप्त माहितीनुसार, लाखांदूर तालुक्यातील आसोला या गावातील रीना शहारे यांना सोमवारी रात्री लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मंगळवारी १९ ऑगस्ट रोजी सकाळी तिला प्रसूती कळा सुरू झाल्या. सकाळी महिलेची प्रसूती झाली मात्र तिचे बाळ गर्भातच दगावल्याचे सांगण्यात आले. दरम्यान बाळंतीण महिलेला मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत असल्याने तिची प्रकृती चिंताजनक झाली. तिला भंडारा जिल्हा रुग्णालयात नेण्याचा निर्णय झाला. मात्र, वाटेतच तिचाही मृत्यू झाला. लाखांदूर हे भंडारा जिल्ह्यातील शेवटच्या टोकावरील तालुका आहे. तिथं आरोग्य सुविधेचा अभाव असल्यानं ही घटना घडल्याचा रोष आता नागरिकांकडून करण्यात येत आहे. रीना शहारे यांना एक मुलगा आहे. दुसऱ्यांदा देखील रीना यांनी त्यांचे बाळ प्रसूतीनंतर गमावले होते. आता तिसऱ्यांदा त्या गर्भवती होत्या. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलाचे मातृछत्र हरवले आहे तर कुटुंबावर देखील मोठा आघात झाला आहे. रीना यांचे पती विनायक हे मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात त्यामुळे त्यांची परिस्थिती बिकट त्याची आहे अशातच पत्नी आणि नवजात बाळाचा मृत्यू हा विनायक यांच्यासाठी मोठा धक्का आहे. लाखांदूर शिवसेना (शिंदे गट) आक्रमक १८ ऑगस्ट रोजी लाखांदूर तालुक्यातील असोला येथील एका महिलेला प्रसूती वेदना आल्यानंतर गर्भवती मातेला ग्रामीण रुग्णालयात प्रसुतीकरिता दाखल करण्यात आलं होतं. मात्र, प्रसुतीनंतर नवजात अर्भकाचा मृत्यू झाला. तर, मातेची प्रकृती चिंताजनक असल्यानं तिला भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात पुढील उपचारासाठी रेफर करण्यात आलं. मात्र वाटेत असतानाचं मातेचाही रुग्णवाहिकेतचं दुर्दैवी मृत्यू झालाय. ही घटना लाखांदुरात घडली. या घटनेनंतर लाखांदूर शिवसेना शिंदे गट आक्रमक झाला असून, त्यांनी २० ऑगस्ट रोजी तालुक्यातील आसोला येथे त्या मृत महिलेच्या घरी जाऊन सांत्वन पर भेट घेतली. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री यांना तहसीलदार यांच्या मार्फत निवेदन सादर करण्यात आले. सदर निवेदनात दोषी डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर निलंबन करून मनुष्यबदाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. व लाखांदूर तालुका हा जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असून या तालुक्यात आरोग्य विषयक सोयीसुविधांचा अभाव असून, या तालुक्यात ट्रामा सेंटर करण्याची ही मागणी या निवेदनातून केली. १८ ऑगस्ट रोजी तालुक्यातील असोला येथील प्रसूतीसाठी आलेल्या महिला ग्रामीण रुग्णालयात दाखल झाली. आणि त्यानंतर त्या महिलेची सोनोग्राफी बघितला असता, सोनोग्राफीमध्ये लिहिलं होतं की गर्भाशयात असलेल्या बाळाला रक्ताचा पुरवठा पुरेशा होत नसल्याने तिला ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी यांनी तिला प्रसूती अति गंभीर असल्याचे सांगितले. आणि प्रसुतीच करायची असेल तर आय. सी. यू. ची गरज अत्यंत भासेल पण ती या ठिकाणी उपलब्ध नाही आहे. त्यासाठी तुम्हाला भंडारा जावे लागेल. असेही सांगण्यात आले. मात्र त्यादिवशी अति मुसळधार पाऊस व नातेवाईक जवळ नसल्याने त्यांनी उद्याला सकाळी नेऊ असे म्हटले. नंतर दुसऱ्या दिवशी १९ ऑगस्ट रोजी पहाटे तीन वाजता चेक केला असता तिला प्रसूतीच्या कळा नव्हत्या. मात्र सकाळी तिला खूपच प्रसूतीच्या काळात जाणवायला लागल्या. प्रसूतीच्या दहा तासा अगोदर गरोदर महिलेला कळा येणे चालू होतात मात्र त्यावेळी असे झाले नाही. १९ ऑगस्ट रोजी सकाळी मीसुद्धा सकाळी दवाखान्यात उपस्थित असताना तिला खूप जोराच्या कळा आल्याने मला आमच्याच रुग्णालयातील कर्मचारी मला बोलवायला आले त्यानंतर मी धाव काढत पटकन निघालो. तिथे गेलो त्यानंतर बाळाने आतमध्ये संडास केली होती. आणि त्याला पूर्वीच रक्ताचा पुरवठा कमी होतो का त्यामुळे त्या बाळाचा प्रसूती दरम्यानच मृत्यू झाला. त्यानंतर त्या महिलेला गर्भाशयातून रक्तस्त्राव सुरू झाला आणि खूप प्रयत्न केला रक्तस्त्राव बंद करण्याचा अखेर तो काही काळाने बंद झाला त्यानंतर आम्ही तिला भंडारा रेफर केला. पण तो नियतीला मान्य नसावा अखेर लाखनी जवळ या महिलेचा पुन्हा रक्तस्त्राव सुरू झाला आणि त्यातच त्या महिलेचा मृत्यू झाला. - डॉ. दत्तात्रय ठाकरे, वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय लाखांदूर.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/hP7Ot8I
भंडाऱ्यातील घटना: प्रसूती पश्चात बाळ आणि बाळंतिणीचा मृत्यू:डॉक्टरांच्या हलगर्जीपणा; नागरिकांचा आरोप
August 20, 2025
0